'पंचायत' मधील 'ही' अभिनेत्री होती नवाजुद्दीनची सिद्दीकीची Ex गर्लफ्रेंड, का झालेलं ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:20 PM2024-05-23T12:20:42+5:302024-05-23T12:22:14+5:30

नवाजुद्दीनचं 'पंचायत' फेम या अभिनेत्रीसोबत होतं अफेअर

Panchayat actress Sunita Rajwar was Nawazuddin Siddiqui s girlfriend during struggle days | 'पंचायत' मधील 'ही' अभिनेत्री होती नवाजुद्दीनची सिद्दीकीची Ex गर्लफ्रेंड, का झालेलं ब्रेकअप?

'पंचायत' मधील 'ही' अभिनेत्री होती नवाजुद्दीनची सिद्दीकीची Ex गर्लफ्रेंड, का झालेलं ब्रेकअप?

टीव्हीएफ ओरिजनल अॅमेझॉन प्राईमवरील 'पंचायत' सीरिजचा तिसरा पार्ट लवकरच प्रदर्शित होतोय. पहिल्या भागापासूनच या सीरिजने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. 'फुलेरा' गावाची कहाणी सर्वांना खूपच आवडली. सीरिजमधील प्रत्येक पात्र गाजलं. सचिवजी, प्रधानजी, रिंकी, विनोद, वनराकस अशा एकापेक्षा एक भूमिका गाजल्या. यातील वनराकसच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सुनीता राजवरही (Sunita Rajwar)प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहे. काहीशी निगेटिव्ह भूमिका तिने सीरिजमध्ये साकारली आहे. खूप कमी जणांना माहित असेल की सुनीता ही नवाजुद्दीनची सिद्दीकीची (Nawazuddin Siddiqui) एक्स गर्लफ्रेंड आहे. 

सुनीता राजवर यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जास्त करुन त्या निगेटिव्ह भूमिकांमध्ये दिसल्या आहेत. संघर्षाच्या दिवसात सुनीता आणि नवाजुद्दीन एकमेकांना डेट करत होते. नवाजुद्दीने स्वत: त्याच्या आत्मचरित्रात 'अॅन ऑर्डिनरी लाईफ'मध्ये हे लिहिले आहे. यामध्ये त्याने संघर्षाच्या दिवसांची आठवण काढत लिहिले, 'मी आणि सुनीता एनएसडीमध्ये शिकत होतो. आमच्यात आधी मैत्री झाली आणि नंतर आम्ही प्रेमात पडलो. दीड वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण तेव्हा गरिबीमुळे सुनीताने मला सोडलं.'

काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीनने आत्मचरित्रात केलेल्या या उल्लेखानंतर सुनीताने यावर आक्षेप घेतला होता. मी पैशांसाठी नवाजुद्दीनला सोडलं नाही. यामागे वेगळं कारण होतं असं तिने स्पष्टीकरण दिलं. वाद वाढल्यानंतर नवाजुद्दीनने म्हणाला की मी वेगळ्या सुनीताचा उल्लेख केला आहे. 

सुनीता राजवरचा जन्म १९६९ साली बरेलीत झाला. 1997 साली तिने एनएसडीमधून डिग्री मिळवली. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'पंचायत' शिवाय 'गुल्लक' वेबसीरिजमधीलही तिची भूमिका गाजली. 28 मे रोजी 'पंचायत' रिलीज होणार आहे.

Web Title: Panchayat actress Sunita Rajwar was Nawazuddin Siddiqui s girlfriend during struggle days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.