कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:22 IST2025-06-03T10:22:01+5:302025-06-03T10:22:37+5:30

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं कॅन्सरने निधन झालं आहे. गेल्या काही  वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याची ही झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. आता विभू राघवच्या निधनानंतर त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

tv actor vibhu raghav died due to cancer spread all over in body last post viral | कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले

कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं कॅन्सरने निधन झालं आहे. गेल्या काही  वर्षांपासून तो कॅन्सरशी लढा देत होता. अखेर त्याची ही झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली. विभूला आतड्याचा कॅन्सर होता. त्याचा कॅन्सर स्टेज ४ पर्यंत पोहोचला होता. सोशल मीडियावरुन तो चाहत्यांना कॅन्सर आणि त्याच्या आरोग्याबाबतचे अपडेट द्यायचा. आता विभू राघवच्या निधनानंतर त्याचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

विभूने एप्रिल महिन्यात त्याच्या कॅन्सर उपचाराविषयी चाहत्यांना अपडेट देत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्याचा कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला होता. केमोथेरेपीचाही काहीच फायदा होत नसल्याचं त्याने व्हिडिओतून चाहत्यांना सांगितलं होतं. "कॅन्सर उपचाराबाबत तुम्हाला अपडेट देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. डिसेंबरमध्ये स्कॅन केल्यानंतर आम्हाला समजलं की कॅन्सर वाढला आहे. लिव्हरपासून तो फुप्फुस, छातीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये आम्ही नवीन केमोथेरेपी सुरू केली होती. चार केमोनंतर आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पुन्हा स्कॅन केलं तेव्हा समजलं की याचा काहीच उपयोग होत नाहीये. आणि कॅन्सर वाढत आहे. त्यामुळे आता आम्ही नवीन ट्रीटमेंट सुरू केली आहे. आता ट्रीटमेंट संपल्यानंतर पुन्हा स्कॅन केल्यावर चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा आहे. तुमचं प्रेम आणि प्रार्थना यांची गरज आहे", असं त्याने व्हिडिओत म्हटलं होतं. विभूच्या मृत्यूनंतर त्याचा हा व्हिडिओ पाहून आता चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. 


२०२२ मध्ये विभू राघवला Colon Cancer (आतड्याचा कॅन्सर) कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून तो कॅन्सरवर उपचार घेत होता. त्याचा कॅन्सर शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. कॅन्सरवरील उपचारामुळे त्याच्याकडचे पैसेही संपले होते. त्याच्यावरील उपचारासाठी आणि त्याला मदतीसाठी अनेक कलाकार पुढे आले होते. निशा और उसके कझन्स, सुरवीन गुग्गल यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं. त्याच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली आहे. 

Web Title: tv actor vibhu raghav died due to cancer spread all over in body last post viral