Video: यश- समीरच्या मैत्रीत वादाची ठिणगी; दोघांमध्ये निर्माण होणार मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 12:59 IST2022-05-18T12:58:59+5:302022-05-18T12:59:14+5:30

Mazi tuzi reshimgath: समीर आणि यशचं जोरदार भांडण होणार आहे. इतकंच नाही तर रागाच्या भरात यश, समीरवर हात उचलणार आहे.

tv serial mazi tuzi reshimgath Yash and Sameers friendship sparks controversy | Video: यश- समीरच्या मैत्रीत वादाची ठिणगी; दोघांमध्ये निर्माण होणार मतभेद

Video: यश- समीरच्या मैत्रीत वादाची ठिणगी; दोघांमध्ये निर्माण होणार मतभेद

छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत आहेत. नेहा ऑफिसच्या कामानिमित्त विदेशात आहे. तर, चौधरी कुटुंबात संपत्तीची वाटणी झाली आहे. मात्र, आजोबांच्या निर्णयामुळे नाखूश असलेली सिम्मी आजोबांसमोर यश आणि नेहाचं सत्य आणणार आहे. यामध्येच आता समीर आणि यशचं जोरदार भांडण होणार आहे. इतकंच नाही तर रागाच्या भरात यश, समीरवर हात उचलणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यश आणि आजोबांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळे दोघंही एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. त्यामुळे समीर दोघांमध्ये मध्यस्थी करायचा प्रयत्न करतो. यावेळी तो यशला आजोबांसमोर जाऊन एकदा बोल असं वारंवार सांगायचा प्रयत्न करतो. मात्र, या सगळ्यात संतापलेला यश, अचानकपणे समीरवर हात उगारतो. ज्यामुळे समीर भावनिकदृष्ट्या दुखावला जातो. 

दरम्यान, आता समीर आणि यशमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर होईल का? त्यांच्यातील मैत्री टीकेल का? की, या दोघांमध्ये कायमची दरी निर्माण होईल या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

Web Title: tv serial mazi tuzi reshimgath Yash and Sameers friendship sparks controversy