कोण आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:23 IST2026-01-27T17:20:22+5:302026-01-27T17:23:44+5:30

Bigg Boss Marathi season 6: बॉयफ्रेंडसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, घरातून बाहेर आल्यानंतर आता राधा म्हणते...

radha patil out of bigg boss marathi season 6 now reveals who is her boyfriend | कोण आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च केला खुलासा

कोण आहे राधा पाटीलचा बॉयफ्रेंड? 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च केला खुलासा

Bigg Boss Marathi season 6:'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये नुकतचं पहिलं एलिमिनेशन झालं. डान्सर राधा पाटील घरातून बाहेर पडली. बाहेर यायच्या आधी राधाची लव्हलाईफ खूप चर्चेत आली होती. अनुश्री मानेशी गप्पा मारताना राधाने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं होतं. 'आम्ही तीन वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहतोय, तो फक्त माझ्याच हाताने जेवतो' असं ती म्हणाली होती. राधाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता आणि तिचा बॉयफ्रेंड कोण आहे यावर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. आता घराबाहेर आल्यानंतर राधाने यूटर्न घेतला आहे. काय म्हणाली राधा पाटील?

तो तर माझा भूतकाळ

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राधा पाटील म्हणाली, "तो माझा भूतकाळ होता. मी आणि अनुश्री तासभर बोलत होतो. त्यात आम्ही एकमेकींच्या भूतकाळाविषयी बोलत होतो. अनुश्रीनेही तिचा भूतकाळ सांगितला. मीही सांगितला. पण मी जे सांगितलं त्यातले काहीच मुद्दे बाहेर आले. तेवढंच फुटेज दाखवलं गेलं. त्यावर रील्स तयार झाले. पण मी लोकांना आज सांगते की तो माझा भूतकाळ होता. मी याआधी एका मुलाखतीतही माझ्या भूतकाळाबद्दल सांगितलं होतं. आता मी रिलेशनशिपमध्ये नाहीये. मी सिंगल आहे. अनुश्रीही तिचं सांगत होती पण तिचं चर्चेत आलं नाही. माझ्याच मुद्द्यावर लोकांनी एवढे रील्स बनवले."

राधा पाटील ही डान्सर आहे. गौतमी पाटीलला टक्कर देणारी अशी तिची लोकप्रियता आहे. बिग बॉसमध्ये मात्र तिला फक्त एक आठवडाच टिकता आलं. कमी मत मिळाल्याने तिला घराबाहेर जावं लागलं. घरात असताना राधा आणि दीपाली सय्यद यांच्यातला वादही गाजला होता. दीपाली सय्यद यांनी राधाला उद्देशून 'तुम्ही करता त्याला लावणी म्हणत नाही' असं वक्तव्य केलं होतं. यावरुन राधा चांगलीच दुखावली होती.

बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणालेली राधा पाटील?

अनुश्री मानेसोबत गप्पा मारताना राधा म्हणालेली की,"आम्ही २ बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. आमची खोली वेगळी आहे. काही वर्षांपासून आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत. मला जर कोणी बोललं तर त्या व्यक्तीला तो सोडणार नाही. तो निर्व्यसनी आहे. आमच्या नात्याला ३ वर्ष झाली पण आजही तो स्वत:च्या हाताने जेवत नाही. मी भरवल्यावरच तो खातो. मुलींची कायम इच्छा असते ना की आपल्याला 'देसी बॉय' मिळावा. माझा बॉयफ्रेंड अगदी तसाच आहे. इथे शोमध्ये सगळे मला इतकं बोलत आहेत. तो जर इथे असता तर त्यांना मारुन निघून गेला असता. आम्ही जेव्हा फिरायला जातो तेव्हा लोकांना माझ्यासोबत नाही तर त्याच्यासोबत फोटो काढायचा असतो. लोक त्याच्यासाठी अक्षरश: वेडे आहेत. पण तो माझा हात कधीच सोडत नाही. इतक्या वर्षांनंतरही आमच्यातलं प्रेम कमी झालेलं नाही. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. मी त्याच्यावर ओरडते, चिडते पण तो सगळं सहन करतो. मला आता त्याच्या आठवणीत रडायला येतंय."

Web Title : राधा पाटिल ने बिग बॉस से बाहर निकलने के बाद बॉयफ्रेंड का सच बताया।

Web Summary : बिग बॉस से बाहर हुईं राधा पाटिल ने अपनी रिलेशनशिप स्टेटस पर सफाई दी। उन्होंने कहा कि लिव-इन पार्टनर के बारे में उनकी पिछली टिप्पणियां उनके अतीत के बारे में थीं। राधा अब दावा कर रही हैं कि वह सिंगल हैं और शो के बाद अपने करियर पर ध्यान केंद्रित कर रही हैं।

Web Title : Radha Patil reveals truth about her boyfriend after Bigg Boss exit.

Web Summary : Evicted Bigg Boss contestant Radha Patil clarified her relationship status. She stated her previous comments about a live-in partner were about her past. Radha now claims she is single and focusing on her career after the show.