'कोण होणार करोडपती'च्या मंचावर प्रशांत दामलेंची हजेरी; सांगणार रंगमंचावरील बहारदार किस्से

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 13:07 IST2023-06-29T13:06:59+5:302023-06-29T13:07:41+5:30

Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड!

Prashant Damle's appearance on the stage of Kon Honaar Crorepati | 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर प्रशांत दामलेंची हजेरी; सांगणार रंगमंचावरील बहारदार किस्से

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर प्रशांत दामलेंची हजेरी; सांगणार रंगमंचावरील बहारदार किस्से

जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. अभिनेता, सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी, व्यक्तिमत्त्वांनी हजेरी लावली आहे. यामध्येच आता रंगभूमीचे हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी हजेरी लावणार आहे.

कोण होणार करोडपतीच्या शनिवारी होणाऱ्या विशेष भागात प्रशांत दामले आणि कविता लाड येणार आहे. यावेळी ही जोडी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेसाठी खेळणार आहेत. प्रशांत दामले स्वतः अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आहेत. मराठी नाटकांच्या भविष्यासाठी ते 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात प्रशांत दामले आणि कविता लाड यांच्याशी गप्पा रंगणार आहेत. सध्या या शोच्या एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये या विशेष भागाची सुरुवात प्रशांत दामले त्यांच्या 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' या गाण्याने झाली आहे. त्यामुळे मंचावर एकदम वेगळेच वातावरण तयार झाले. 

 प्रशांत दामले आणि कविता लाड हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त झाले. प्रशांत दामले काही ठराविक नाट्यगृहांत प्रयोग का करत नाहीत, याबद्दल त्यांनी सांगितले. प्रशांत दामले यांनी 'मोरूची मावशी' नाटकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. सुरुवातीला १६१ प्रयोग होईपर्यंत हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजले नव्हते. त्यानंतर दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी त्यातील गाणे सादर केले. ते गाणे प्रेक्षकांना इतके आवडले की त्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यापुढील आजपर्यंतचे सगळे प्रयोग हाऊसफूल गेले, अशी आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली. 

दरम्या, प्रशांत दामले आणि कविता लाड यांनी भरपूर वर्षे एकत्र काम केले आहे. आजवरच्या कारकिर्दीत झालेल्या अनेक आठवणी या मंचावर उलगडणार आहेत. अनेक नाटकांदरम्यान झालेले किस्से आणि आठवणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील. हा विशेष भाग १ जुलै रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. 

Web Title: Prashant Damle's appearance on the stage of Kon Honaar Crorepati