'कुण्या राजाची तू गं राणी'मधून 'या' अभिनेत्रीची एक्झिट; तिच्याजागी होतीये सविता मालपेकरांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 13:28 IST2023-11-09T13:27:33+5:302023-11-09T13:28:31+5:30

Savita malpekar: या मालिकेत सविता मालपेकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

marathi actress-exit-in-kunya-rajachi-ga-tu-rani-marathi-serial-and-savita-malpekar-entry | 'कुण्या राजाची तू गं राणी'मधून 'या' अभिनेत्रीची एक्झिट; तिच्याजागी होतीये सविता मालपेकरांची एन्ट्री

'कुण्या राजाची तू गं राणी'मधून 'या' अभिनेत्रीची एक्झिट; तिच्याजागी होतीये सविता मालपेकरांची एन्ट्री

छोट्या पडद्यावर काही दिवसांपूर्वीच कुण्या राजाची तू गं रानी ही नवीन मालिका सुरु झाली. अभिनेता हर्षद अतकरी आणि शर्वरी जोग यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे. एका छोट्याशा गावात राहणाऱ्या गुंजाची प्रेरणादायी कथा या मालिकेतून उलगडली जात आहे त्यामुळे ही मालिता सध्या लोकप्किय मालिकांपैकी एक आहे. विशेष म्हणजे लवकरच या मालिकेत एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी वाटचाल करणाऱ्या या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्री काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता तिच्या जागी एका नवा अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. सध्या या मालिकेत शर्वरी आणि हर्षद व्यतिरिक्त राजन भिसे, संजय खापरे, समिधा गुरु, पूर्णिमा डे, प्रियंका नार, तनिष्का म्हाडसे  आणि वसुधा देशपांडे  ही कलाकार मंडळी झळकत आहेत. परंतु, यांच्यापैकी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे.

गुंजाला सतत त्रास देणारी कडू आजी ही भूमिका साकारणाऱ्या वसुधा देशपांडे यांनी कुण्या राजाची तू गं राणी ही मालिका सोडली आहे. त्यांनी मालिका सोडण्यामागचं कारण अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांच्या एक्झिटमुळे या मालिकेत अभिनेत्री सविता मालपेकर यांची एन्ट्री होणार आहे.

Web Title: marathi actress-exit-in-kunya-rajachi-ga-tu-rani-marathi-serial-and-savita-malpekar-entry