काय असेल रायाचा भूतकाळ? 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रंजक वळण, 'ही' नावाजलेली अभिनेत्री घेणार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:00 IST2026-04-17T16:59:35+5:302026-04-17T17:00:59+5:30
राया-मंजिरीच्या आयुष्यात नवं वादळ!मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एन्ट्री, आता काय घडणार?

काय असेल रायाचा भूतकाळ? 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रंजक वळण, 'ही' नावाजलेली अभिनेत्री घेणार एन्ट्री
Television: छोट्या पडद्यावरील मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या मालिकांमध्ये येणारे ट्विस्ट तसेच त्यात घडणाऱ्या घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात. अशीच एक सातत्याने चर्चेत असणारी मालिका म्हणजे येड लागलं प्रेमाचं. सध्या ही मालिका रंजक वळणार आली. या मालिकेतील राया-मंजिरीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.
दरम्यान, मालिकेत राया-मंजिरीच्या प्रेमकहाणीत नेहमीच काही ना काही अडथळे येत आहेत. मिस फायरसाठी जीवाचं रान करणारा राया आता विशाल भोसले म्हणून त्याची ओळख सांगतो.आणि मंजिरीपासून दुरावला आहे. अलिकडेच या मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणेंची वर्णी लागली आहे. किशोरी शहाणे-विज या मालिकेत इंद्रायणी धर्माधिकारी हे पात्र साकारताना दिसत आहेत. अशातच आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना नवा दिसणार आहे.
'या' अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री!
नुकतीच येड लागलं प्रेमाचं मालिकेत अभिनेत्री मयुरी वाघची एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ती गार्गी नावाची भूमिका साकारणार आहे.एकीकडे मंजिरीसमोर रायाचा भुतकाळ उलगडत असताना त्यांच्या आयुष्यात गार्गीची एन्ट्री होते. ही गार्गी म्हणजे रायाची जबाबदारी असल्याचं इंद्रायणी धर्माधिकारी त्याला सांगते. हे सगळं पाहून मंजिरीला देखील धक्का बसतो. त्यामुळे आता गार्गीच्या येण्याने त्यांच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.