नवीन सुरुवात! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:15 IST2025-06-14T17:14:05+5:302025-06-14T17:15:54+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक 

hindi television actress neha laxmi buy new house in mumbai share grihpravesh photo on social media | नवीन सुरुवात! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक 

नवीन सुरुवात! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखवली झलक 

Neha laxmi New Home : लोकप्रिय टीव्ही मालिका कुबूल है तसेच इश्कबाज यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे नेहा लक्ष्मी. अगदी वर्षभरापूर्वी नेहाने तिचा प्रियकर रुद्राशय जोशीसोबत लग्नगाठ बांधली.त्यानंतर आता अभिनेत्रीने वर्षभरातच चाहत्यांना आणखी एक गुडन्यूज दिली आहे. नुकतंच अभिनेत्रीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. आपल्या नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्रीने सगळ्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 


नेहा लक्ष्मीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नवीन घरातील खास फोटो शे्र केले आहेत. या पोस्टमध्ये तिने आनंद व्यक्त करत म्हटलंय, "नवीन सुरुवात. पवित्र विधी आणि  मनापासून कृतज्ञ. अखेर इतके दिवस जे स्वप्न पाहत होतो ते स्वप्न पूर्ण झालं.आम्ही त्या घरात पाऊल ठेवलं. आनंदाने आणि हात जोडून प्रार्थना आम्ही आमची वास्तुशांती पूजा केली.या पवित्र जागेच्या प्रत्येक कोपऱ्यात दैवी आशीर्वाद असेल.शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी आम्ही वास्तुशांती पूजा केली. "

त्यानंतर अभिनेत्रीने लिहिलंय, "हे फक्त एक घर नाही तर हे आमच्या आयुष्याची सुरुवात आहे, जी प्रेम आणि स्वप्नांनी बांधली आहे." अशा आशयाची सुंदर पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. नेहाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह हिंदी कलाविश्नातील सेलिब्रिटी मंडळींनी प्रेमाचा वर्षाव करत तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान, नेहाने शुभप्रसंगी हिरव्या रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. तसेच त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज परिधान ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. 

वर्कफ्रंट

नेहाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने 'कुबूल है', 'इश्कबाज' या मालिकांव्यतिरिक्त तिने 'ना आना इस देस लाडो', 'क्रिष्णाबेन खाखरावाला'
'ससुराल सिमर का' मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Web Title: hindi television actress neha laxmi buy new house in mumbai share grihpravesh photo on social media