धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं अभिनेत्याचं घर 'साफ', तब्बल ७ लाख रुपयांचा ऐवज अन दागिने चोरून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:05 IST2026-04-22T11:57:26+5:302026-04-22T12:05:34+5:30

सध्या मनोरंजनविश्वात एका अभिनेत्याच्या घरी घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.घरात काम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरणीने अभिनेत्याच्या घरात लाखोंचा डल्ला मारला आहे.

hindi television actor vipul roy house burgled by helper 7.10 lakh cash and ornaments stolen in khar | धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं अभिनेत्याचं घर 'साफ', तब्बल ७ लाख रुपयांचा ऐवज अन दागिने चोरून फरार

धक्कादायक! घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं अभिनेत्याचं घर 'साफ', तब्बल ७ लाख रुपयांचा ऐवज अन दागिने चोरून फरार

Actor Vipul Roy: मुंबईतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता विपुल रॉयच्या मुंबईतील घरी चोरी झाली आहे. अभिनेत्याच्या घरातून मदतनीस बाईने तब्बल ७.१० लाख किंमतीचे दागिने घेऊन पळ काढला. या प्रकरणी खार पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तिच्यावर विपुल रॉय यांच्या घरातून भारतीय आणि विदेशी चलन, तसेच ७.१० लाख किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने  लंपास केले आहेत.संबंधित घटना ६ एप्रिल रोजी घडली आणि 
२१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,विपुल रॉय हा खार पश्चिम येथे त्याती पत्नी आणि मुलीसोबत राहतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता परदेशात गेला होता आणि त्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

६ एप्रिल रोजी विपुल रॉयने दिपाली नावाच्या महिलेला घर स्वच्छ करण्यासाठी कामावर बोलावलं.यापूर्वी तिने अभिनेत्याच्या घरी बऱ्याचदा काम केलं होतं, त्यामुळे कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. अभिनेत्याने सांगितल्यानुसार, ६ एप्रिलच्या दिवशी सकाळी सुमारे १०:४५ वाजता घरकाम केल्यानंतर ती अवघ्या १५ मिनिटांत काम करून निघाली. त्यानंतर विपुलही कामावर गेला आणि रात्री १० च्या सुमारास घरी परतला. त्या रात्री, जेव्हा विपुल रॉयने त्याचे कपाट उघडले, तेव्हा त्याला आढळले की दागिने, भारतीय आणि विदेशी चलन गायब झाले होते.

विपुल रॉय हा हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'एफआयआर' या टीव्ही शोमध्ये भोला पंडितची भूमिका साकारून तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर त्याने 'व्हॉट द जट' या पंजाबी चित्रपटातही काम केलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्याने 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' मध्ये देखील भाग घेतला आणि त्यानंतर 'सा रे ग म प मेगा चॅलेंज' असे शो देखील होस्ट केले आहेत.

Web Title : अभिनेता विपुल रॉय के घर से नौकरानी ने 7 लाख के गहने चुराए

Web Summary : अभिनेता विपुल रॉय के घर में उनकी नौकरानी ने 7.10 लाख रुपये के गहने और नकदी चुरा ली। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। चोरी 6 अप्रैल को हुई। रॉय घटना के समय देश से बाहर थे।

Web Title : Actress's House Help Steals ₹7 Lakh Worth of Valuables

Web Summary : Actor Vipul Roy's house was robbed by his domestic help, who stole ₹7.10 lakh worth of jewelry and cash. Police have registered a case and are investigating the theft, which occurred on April 6th. Roy was out of the country when the incident happened.