Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेला थोड्याच वेळात सुरुवात! कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:27 IST2026-04-19T19:26:39+5:302026-04-19T19:27:12+5:30

'बिग बॉस मराठी ६' या शोचा आज ग्रँड फिनाले आहे. थोड्याच वेळात ग्रँड फिनालेला सुरुवात होणार आहे. राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या पाच जणांमध्ये ग्रँड फिनालेची चुरस रंगणार आहे

Bigg Boss Marathi 6 Grand finale live updates tanvi kolte anushree mane riteish deshmukh | Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेला थोड्याच वेळात सुरुवात! कोण मारणार बाजी?

Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेला थोड्याच वेळात सुरुवात! कोण मारणार बाजी?

'बिग बॉस मराठी ६' या शोचा आज ग्रँड फिनाले आहे. थोड्याच वेळात ग्रँड फिनालेला सुरुवात होणार आहे. राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या पाच जणांमध्ये ग्रँड फिनालेची चुरस रंगणार आहे. या पाच जणांपैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ग्रँड फिनालेला अवघी काही मिनिटं बाकी असताना ग्रँड फिनालेत कोण होणार 'बिग बॉस मराठी ६' चा महाविजेता? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

वोटिंगच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या पाच जणांपैकी राकेश, अनुश्री आणि तन्वी यांच्यामध्ये ग्रँड फिनालेसाठी तगडी स्पर्धा बघायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विशाल आणि दिपाली कमी वोट्स मुळे घराबाहेर पडतील अशी शक्यता आहे. आता निकाल काय लागणार आणि पाच जणांपैकी घराबाहेर कोण जाणार, हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल.

रितेश देशमुख पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेचं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे 'बिग बॉस मराठी ६'च्या या ग्रँड फिनालेला अभिषेक बच्चन आणि जिनिलिया देशमुखही हजेरी लावणार आहे. रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचं प्रमोशन आज 'बिग बॉस मराठी ६'मध्ये होणार आहे. त्यानिमित्त अभिषेक आणि जिनिलिया 'बिग बॉस मराठी ६'च्या टॉप ५ स्पर्धकांशी गप्पा मारतील

Web Title : बिग बॉस मराठी 6 फिनाले: आज कौन जीतेगा?

Web Summary : बिग बॉस मराठी 6 का ग्रैंड फिनाले आज! राकेश, अनुश्री और तन्वी प्रबल दावेदार हैं। रितेश देशमुख होस्ट करेंगे, अभिषेक बच्चन और जेनेलिया 'राजा शिवाजी' का प्रचार करेंगे।

Web Title : Bigg Boss Marathi 6 Finale: Who Will Win Tonight?

Web Summary : Bigg Boss Marathi 6 grand finale is tonight! Rakesh, Anushree, and Tanvi are top contenders. Riteish Deshmukh hosts, with Abhishek Bachchan and Genelia promoting 'Raja Shivaji'.