ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला 27 वर्ष जुना फोटो, एव्हरग्रीन कपलला पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:45 PM2024-02-12T12:45:00+5:302024-02-12T12:45:36+5:30

२७ वर्षांचा सहजीवनाचा प्रवास

Aishwarya Narkar shared a 27 year old photo fans showered comments after seeing the evergreen couple | ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला 27 वर्ष जुना फोटो, एव्हरग्रीन कपलला पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला 27 वर्ष जुना फोटो, एव्हरग्रीन कपलला पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

मराठीतलं एव्हरग्रीन कपल अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांच्या सहजीवनाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. याही वयात दोघंही तरुणांनाही लाजवतील एवढे फीट आहेत. त्यांचे सोशल मीडियावरील रील्सही तुफान व्हायरल होत असतात. काही रील्सवरुन त्यांना ट्रोलही केलं जातं तर काही व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळते. नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामुळे चाहतेही जुन्या आठवणीत रमले आहेत.

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन फोटो आहेत. एक फोटो 1997 सालचा म्हणजेच २७ वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये ऐश्वर्या यांनी हिरवी साजी नेसली आहे. त्यांचा हा तरुणपणीचा फोटो पाहून चाहत्यांच्याही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.  तर दुसरा फोटो याच वर्षीचा आहे. 'stay rooted एकत्र मोठे होऊया, या प्रवासाचा आनंद घेऊया' असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'त्यावेळेसही छान दिसत होता आणि आताही छानच दिसता', 'जगातलं सुंदर कपल आहे हे' अशा कमेंट्स करत या एव्हरग्रीन जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकर यांनी 'गंध निशिगंधाचा' नाटकात पहिल्यांदा एकत्र काम केलं. याचवेळी दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या यांना लग्नाची मागणी घेतली. 3 डिसेंबर 1995 साली ते लग्नबंधनात अडकले.

Web Title: Aishwarya Narkar shared a 27 year old photo fans showered comments after seeing the evergreen couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.