माझे 'ते' सीन्स काढून टाकता येतील का? कियाराने 'टॉक्सिक'च्या टीमकडे केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:06 IST2026-05-02T16:06:11+5:302026-05-02T16:06:53+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीने चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतला आहे.

Kiara advani made a request to the 'Toxic' team that removed her intimate scenes with yash | माझे 'ते' सीन्स काढून टाकता येतील का? कियाराने 'टॉक्सिक'च्या टीमकडे केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

माझे 'ते' सीन्स काढून टाकता येतील का? कियाराने 'टॉक्सिक'च्या टीमकडे केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या आगामी 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे. एक म्हणजे चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे आणि दुसरे म्हणजे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीने चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतला आहे.

कियारा अडवाणीचा 'इंटीमेट' सीनला आक्षेप?

या चित्रपटात यशच्या विरुद्ध पाच अभिनेत्री झळकणार आहेत, ज्यात कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटात यश आणि कियारा यांच्यामध्ये काही रोमँटिक आणि 'इंटीमेट' सीन्स चित्रित करण्यात आले आहेत.शूटिंगच्या वेळी कियारा या दृश्यांसाठी कम्फर्टेबल होती, मात्र आता हे सीन पाहिल्यानंतर तिने आपले मत बदलले आहे. कियाराने दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांच्याकडे या सीनची लांबी कमी करण्याची किंवा शक्य असल्यास हे सीन पूर्णपणे हटवण्याची विनंती केल्याचे समजते.

रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणी या चित्रपटासाठी तब्बल १५ कोटी रुपये मानधन घेत आहे, जे तिच्या मागील मानधनापेक्षा खूप जास्त आहे. कियाराचा मागील चित्रपट 'वॉर २' बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला होता, त्यामुळे 'टॉक्सिक' कडून तिला मोठ्या अपेक्षा आहेत.



'टॉक्सिक' आधी १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र त्यावेळी 'धुरंधर २' सोबत होणारी टक्कर आणि मध्यपूर्वेतील (Middle East) तणावपूर्ण परिस्थितीमुळे तारीख बदलून ४ जून करण्यात आली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

या चित्रपटात कियारा अडवाणीसोबतच हुमा कुरेशी, नयनतारा, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिनेत्रीने केलेल्या मागणीवर निर्माते काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या तरी या बदलांमुळे आणि प्रदर्शनाच्या तारखेमुळे 'टॉक्सिक' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Web Title : कियारा ने 'टॉक्सिक' से दृश्य हटाने का अनुरोध किया, असहजता बताई।

Web Summary : खबर है कि कियारा आडवाणी ने 'टॉक्सिक' टीम से अंतरंग दृश्यों को हटाने का अनुरोध किया। पहले सहमत होने के बावजूद, अब देखने में असहजता बताई। फिल्म रिलीज में देरी। कियारा यश के साथ मुख्य भूमिका में; हुमा कुरेशी, नयनतारा भी हैं।

Web Title : Kiara requests removal of scenes from 'Toxic' due to discomfort.

Web Summary : Kiara Advani reportedly requested 'Toxic' team to cut/remove intimate scenes. Citing discomfort viewing them now, despite initial agreement. Film release delayed. Kiara stars alongside Yash; also features Huma Qureshi, Nayanthara.