'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी होतेय ट्रोल, शरीरावरच लिहिले 'ब्राईड टू बी'; Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:40 PM2023-02-20T13:40:38+5:302023-02-20T13:51:24+5:30

'ये है मोहोब्बते' फेम कृष्णा मुखर्जी सध्या थायलंडमध्ये गर्लगॅंगसोबत एंजॉय करत आहे.

'ये है मोहोब्बते 'फेम अभिनेत्री कृष्णा मुखर्जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वी कृष्णा मित्रपरिवारासोबत एंजॉय करताना दिसत आहे. दरम्यान तिचे फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.

कृष्णा मुखर्जीने ये है मोहोब्बते मधून लोकप्रियता मिळवली. ती लवकरच चिराग बाटलीवालासह लग्नबंधनात अडकणार आहे. चिराग नेव्ही ऑफिसर आहे.काही दिवसांपूर्वीच दोघांनी स्वप्नवत वाटावे अशा पद्धतीने साखरपुडा केला. ते फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय होते.

आता कृष्णा अगदीच बोल्ड अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर करत असल्याने ती जास्त ट्रोलच होताना दिसत आहे.तिचे हो फोटो नेटकऱ्यांनी रुचलेले दिसत नाहीत.

कृष्णा तिच्या गर्लंगॅंगसोबत थायलंडमध्ये पोहोचली असून तिथेच ती लग्नाआधी एंजॉय करत आहे. तिच्या सोबत तिची बहिण सरु मुखर्जी, ये है मोहोब्बते मधील सहकलाकार शिरीन मिर्झा आणि इतर मैत्रिणी दिसत आहेत.

कृष्णाने चक्क शरिरावरच 'ब्राईड टू बी' असे लिहिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 'मॅडम हे असं वागण्याची खरंच गरज आहे का' असं एकाने म्हणलं आहे.

कृष्णाने डीप नेक ब्लॅक स्लीट वन पीस मध्ये बोल्ड दिसत आहे. मात्र तिने शरिरावर असे लिहिणे काही नेटकऱ्यांच्या पचनी पडलेले नाही.

एका हॉटेलमध्ये कृष्णा आणि तिचा गर्लगॅंग ड्रिंक, पार्टी, रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. सर्वांचाच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. मात्र या फोटोंमुळे तिला ट्रोलिंगलाच सामोरे जावे लागत आहे.

कृष्णा गेल्या काही वर्षांपासून चिरागसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र तिने कधीच या रिलेशनविषयी वाच्यता केली नव्हती. काही महिन्यांपूर्वीच साखरपुड्याचे फोटो टाकत तिने रिलेशनशिपचा खुलासा केला.