आशकाने शेअर केलेत एकापेक्षा एक सुंदर फोटो, क्षणात झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 07:00 AM2021-01-07T07:00:00+5:302021-01-07T07:00:02+5:30

फिटनेसची ‘दिवानी’ आहे आशका

टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया लग्नानंतर सतत चर्चेत असते ती तिच्या योगा करतानाच्या फोटोंमुळे.

सोशल मीडियावर योगा पोजमधले अनेक फोटो ती शेअर करत असते.

आता तिने योगा करतानाचे काही नवे फोटो शेअर केले आहेत.

आशका टीव्ही इंडस्ट्रीचा मोठा व लोकप्रिय चेहरा आहे. आशकाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेय.

आशकाने ‘अचानक 37 साल बाद’ मधून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

यानंतर ती एक्टिंग-एक्टिंग, बिग बॉस , बाल वीर, नच बलिए आणि कुसुम , क्योंकि सास भी कभी बहू थी आणि नागिन अशा अनेक मालिकांमध्ये झळकली होती.

आशका गोराडियाने बॉयफ्रेंड ब्रैड गोब्‍लेसह 3 डिसेंबर 2017 ला विवाहबंधनात अडकली होती.क्रिश्‍चन -हिंदु दोन्ही पारंपरिक पद्धतीने तिचे लग्न झाले होते.

आशकाच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

आशका सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो.