Photos: ...अखेर लतिका-अभिमन्यु आले एकत्र; रोमॅण्टिक डेटचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 07:00 PM2021-11-16T19:00:32+5:302021-11-16T19:07:00+5:30

Sundara Manamadhye Bharali: व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लतिकाने लाल रंगाची साडी नेसली असून अभिमन्युने फॉर्मल कपडे परिधान केले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत सध्या अनेक नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहेत.

लग्नानंतर एकमेकांसोबत जराही न पटणारे अभिमन्यु आणि लतिका आता एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून लतिका तिच्या मनातील गोष्ट अभिमन्युला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काही केल्या तिला सांगणं शक्य होत नाही

यामध्येच अभिमन्यु आणि लतिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये ही जोडी रोमॅण्टिक डेटवर गेल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लतिकाने लाल रंगाची साडी नेसली असून अभिमन्युने फॉर्मल कपडे परिधान केले आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोसोबतच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दोघही छान डान्स करताना दिसत आहे.

परंतु, व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये लतिका आणि अभिमन्यु खरंच एकमेकांच्या जवळ आले आहेत. की, या दोघांपैकी कोणाला तरी हे स्वप्न पडलंय हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या रोमॅण्टिक फोटोमागचं सत्य प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहे.

या फोटोमध्ये अभिमन्यु गुडघ्यांवर बसून लतिकाला प्रपोज करताना दिसत आहे.