ये शौक ये शरारत, नफासत नजाकत! 'देवयानी' फेम अभिनेत्री चर्चेत, ट्रेंडिग गाण्यावर बनवला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 05:13 PM2024-05-22T17:13:57+5:302024-05-22T17:18:44+5:30

'देवयानी' फेम अभिनेत्री दिपाली पानसरे हे नाव चाहत्यांसाठी काही नवं नाही.

मराठीसह वेगवेगळ्या हिंदी मालिकांमध्येही तिने धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील संजना या पात्राने तिला प्रचंड स्टारडम मिळवून दिला.

सध्या अभिनेत्री 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत काम करताना दिसतेय.

'इस प्यार को क्या नाम दू' , 'दिल मिल गए' यांसारख्या हिंदी मालिकाही तिने गाजवल्या आहेत.

नुकताच दिपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

'ओ सजनी रे...' या गाण्यावर व्हिडिओ शूट करत अभिनेत्रीने साऱ्यांच लक्ष स्वत: कडे वेधलं आहे.

निळ्या रंगाच्या साडीमध्ये वेगवेगळ्या पोज देत तिने हा व्हिडिओ शूट केला आहे.