साध्याभोळ्या मराठी अभिनेत्रीचा समुद्रकिनारी हॉट अंदाज, तन्वी मुंडलेचे फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:42 PM2024-06-11T13:42:34+5:302024-06-11T13:50:22+5:30

तन्वीने समुद्रकिनारी हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

तन्वी मुंडले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'पाहिले न मी तुला' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

पहिल्याच मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिल्यानंतर 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत तन्वी दिसली होती. यामध्ये तिने साकारलेली कावेरी ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

तन्वीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच तन्वीने नवीन फोटोशूट केलं आहे.

तन्वीने समुद्रकिनारी हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस तिने परिधान केल्याचं दिसत आहे. फोटोसाठी तिने खास पोझही दिल्या आहेत.

साध्याभोळ्या तन्वीचे हे फोटोशूट पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तन्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

भाग्य दिले तू मला या मालिकेत तन्वीला चाहत्यांनी पसंत केलं होतं. या मालिकेतील तिची साध्याभोळ्या सुनेची भूमिका चाहत्यांना आवडली होती.