'ओ सजनी रे...' निळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये समृद्धीचं क्लासी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:45 PM2024-05-22T15:45:00+5:302024-05-22T15:45:00+5:30

Samruddhi kelkar: समृद्धी सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते.

मराठी कलाविश्वात सध्या समृद्धी केळकर हे नाव चांगलंच लोकप्रिय झालं आहे.

अगदी मोजक्या कालावधीमध्ये समृद्धीने मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

समृद्धीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेपूर्वी तिने लक्ष्मी सदैव मंगलम, पुढचं पाऊल, लेक माझी लाडकी, ढोलकीच्या तालावर यांसारख्या मालिका आणि कार्यक्रमात काम केलं आहे.

ब्ल्यु कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

समृद्धी नवनवीन पोस्ट चाहत्यांसाठी शेअर करत असते.