शशांक केतकरची सख्खी बहीणदेखील आहे अभिनेत्री, 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:23 PM2022-06-23T12:23:48+5:302022-06-23T12:28:15+5:30

Shashank ketar sister:शशांकप्रमाणेच त्याची बहिणीदेखील मराठी कलाविश्वात सक्रीय असून तिने काही गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे शशांक केतकर. उत्तम अभिनय आणि गुडलुकिंगमुळे शशांक कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतो.

तरुणींमध्ये शशांकची विशेष क्रेझ असून सोशल मीडियावर आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

होणार सून मी या घरची, पाहिले न मी तुला,मन बावरे अशा कितीतरी मालिकांच्या माध्यमातून शशांक प्रेक्षकांच्या भेटीला आला.

शशांक सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असून अनेकदा त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो.

सध्या शशांकसह त्याच्या धाकट्या बहिणीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

शशांकप्रमाणेच त्याची बहिणीदेखील मराठी कलाविश्वात सक्रीय असून तिने काही गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

दिशाचा सोशल मीडियावर चांगलाचा वावर असून वरचेवर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

दिक्षाने तू सौभाग्यवती हो या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे.

दिशा पारंपरिक कपड्यांसह वेस्टर्न आऊटफिटमध्येही तिचे फोटो शेअर करत असते.