फुलराणी!! भारती सिंहने केलं मॅटर्निटी फोटोशूट; पाहा फुलांमध्ये सजलेल्या कॉमेडी क्वीनचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 10:39 AM2022-03-20T10:39:41+5:302022-03-20T10:43:01+5:30

Bharti singh:भारतीने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर अवघ्या काही तासांमध्ये तीन लाख ५७ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी कॉमेडी क्वीन म्हणजे भारती सिंह.

भारती लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

विशेष म्हणजे भारती सध्या ८ महिन्यांची प्रेग्नंट आहे तरीदेखील ती शुटींगचं काम करत आहे.

अलिकडेच भारतीने मॅटर्निटी फोटोशूट केलं असून या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

आई होणार असल्याचं तेज भारतीच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

भारतीने मॅटर्निटी फोटोशूटसाठी खास थीम सिलेक्ट केली होती. त्यानुसार, तिने फुलांमध्ये फोटोशूट केलं आहे.

भारतीने तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर अवघ्या काही तासांमध्ये तीन लाख ५७ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

भारतीच्या या फोटोशूटवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.

या फोटोव्यतिरिक्त अलिकडेच भारतीने पती हर्ष लिंबाचियासोबतही होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते.