श्री ची जान्हवी खूपच बदलली, शॉर्ट वनपीसमध्ये तेजश्री प्रधानचा 'बॉसी लूक'! पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 06:18 PM2024-03-07T18:18:51+5:302024-03-07T18:39:08+5:30

सोज्वळ घरंदाज जान्हवीचं 'हाय-क्लास' फोटोशूट एकदा पाहाच

Tejashree Pradhan Hot Look: तेजश्री प्रधान म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील एक गुणवान आणि आघाडीची अभिनेत्री. सध्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून ती लोकांच्या भेटीला येते.

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील तेअँजश्री तुम्हाला आठवत असेलच. तिची जान्हवी ही व्यक्तिरेखा आणि सोज्वळ घरंदाज लूक साऱ्यांनाच भावला.

पण श्री ची जान्हवी आता मात्र पूर्णपणे बदलून गेल्याचं दिसतंय. नुकताच तिने एका फोटोशूट केलाय, ज्यात ती सोज्वळ नव्हे तर 'बॉसी लूक'मध्ये दिसतेय.

तेजश्रीने आजच आपल्या एका फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात तिचा वेगळाच आक्रमक लूक पाहायला मिळतोय.

या फोटोंमध्ये तिने एक शॉर्ट वनपीस घातलाय आणि त्यावर लेदर बेल्ट आणि लेदरचे लाँग शूज असा पेहराव केलाय.

एका स्टायलिश वूडन इंटेरियर असलेल्या ठिकाणी हा फोटोशूट करण्यात आला असून तिच्या पोज लक्ष वेधून घेत आहेत.

फोटोसोबत दिलेलं कॅप्शनदेखील खूपच आकर्षक आहे. माझ्या आवडीनिवडी महागड्या आहेत, पण ते मला मान्य आहे कारण त्या मी स्वत:च पूर्ण करते.