'हम साथ-साथ हैं' मधील 'ही' चिमुकली आज आहे सुपर मॉडल; फोटो पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:55 PM2021-12-31T12:55:12+5:302021-12-31T13:17:06+5:30

Zoya afroz: जोयाने हम साथ साथ है सोबतच 'कहो ना कहो', 'प्यार के साथ तिया से', 'यह बेनकाब', 'स्वीटी वेड्स एनआरआई' यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बॉलिवूडच्या इतिहासातील 'हम साथ साथ हा है' हा चित्रपट विसरणं कोणताही प्रेक्षकाला शक्य नाही. एकत्र कुटुंबपद्धतीचं उत्तम उदाहरण या चित्रपटात पाहायला मिळालं होतं. त्यामुळे हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता. आजही हा चित्रपट अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानावर आहे.

सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, तब्बू असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपट झळकले होते.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज जवळपास २० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. मात्र, त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची गर्दी होती. परंतु, या कलाकारांमध्येही तीन बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केलं. आज हे तीनही बालकलाकार काय करतात?, कसे दिसतात? हा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. त्यामुळेच या चित्रपटात बालकलाकार जोया अफरोज हिच्याविषयी जाणून घेऊयात.

हम साथ साथ है या चित्रपटात जोया अफरोज हिने अभिनेत्री नीलम म्हणजेच संगीता हिच्या मुलीची भूमिका साकारली होती.

जोया आता चांगलीच मोठी झाली असून मॉडलिंग क्षेत्रात तिचं नशीब आजमावत आहे.

जोया मूळची लखनौची असून तिने मुंबईत तिचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे.

सध्या जोया कलाविश्वापासून दूर असली तरीदेखील ग्लॅमरस विश्वात सक्रीय आहे. आज ती फेमस सुपर मॉडेल म्हणून ओळखली जाते.

जोयाने अनेक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला आहे.

जोयाने अनेक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला आहे. पॉण्ड्स फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत ती सेकंड रनरअपदेखील ठरली आहे.

जोयाने हम साथ साथ है सोबतच 'कहो ना कहो', 'प्यार के साथ तिया से', 'यह बेनकाब', 'स्वीटी वेड्स एनआरआई' यांसारख्या काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.