'अपशकुनी' म्हणून हिणवलं, १३ चित्रपटांतून दाखवला बाहेरचा रस्ता; बॉलिवूडमधील 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आज आहे १३६ कोटींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 01:16 PM2023-11-18T13:16:52+5:302023-11-18T13:25:54+5:30

आपल्या अदाकारांनी प्रेक्षकांना भूरळ पाडणारी ही अभिनेत्री सध्या तिच्या फैशन सेन्समुळे चर्चेत आली आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीत या अभिनेत्रीला प्रचंड संघर्ष करावा लागला.ही अभिनेत्री कोण आहे, तुम्हाला माहीत नसेलचं! चला तर मग जाणून घेऊया या अभिनेत्राचा थक्क करणारा प्रवास...

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन हे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. विविधांगी पात्र साकारून विद्या बालनने हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबर विद्या तिच्या फॅशन सेन्समुळेही ओळखली जाते.

पण, विद्या बालनचा सिनेसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला. तब्बल १ नाही तर १३ चित्रपटांमधून विद्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. इतकचं नाही तर एक वेळ अशी होती की त्यावेळी अभिनेत्रीला 'अपशकुनी' म्हटलं जात होतं.

'भलो थेको' या बंगाली चित्रपटातून विद्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. बंगाली चित्रपटातील तिच्या या भूमिकेच खूप कौतुकही झालं.विद्या बालनने 'परिणीती' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.अभिनेता सैफ अली खान सोबत ती या चित्रपटात झळकली होती.

एके दिवशी विद्याने माधुरी दीक्षितला 'तेजाब' चित्रपटातील तिच्या 'एक दो तीन' या आयकॉनिक गाण्यावर नाचताना पाहिले. इथूनच तिने बालवयात अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिला माधुरी दीक्षितसारखी अभिनेत्री व्हायचं होतं. त्यासाठी विद्या बालन तिच्या खोलीत आरशासमोर उभी राहायची आणि तासनतास त्या गाण्यावर नाचायची.

अनेक वर्षांपूर्वी विद्याने एका मुलाखतीत तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल अनुभव कथन केले. तिच्या उभरत्या काळात तिला चक्क १३ चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आले होते. "एका निर्मात्याने मला खूप वाईट वागणूक दिली. त्यामुळे मी इतकी दुखावले गेली की मी सहा महिने आरशात स्वतःकडे पाहण्याचे धाडस करू शकले नाही",असं विद्या सांगते.

काही कारणास्तव एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचे चक्क १२ चित्रपट फ्लॉप ठरले. पण या संपूर्ण प्रकरणाचे खापर त्या दिग्दर्शकाने अभिनेत्री विद्या बालनवर फोडले. यासाठी विद्याला दोषी ठरवून तिला 'पनौती' म्हणून हिणवलं गेलं होतं.

हा संपूर्ण काळ या अभिनेत्रीसाठी संघर्षमय होता.परंतु, संकटांना घाबरेल ती विद्या कसली!केवळ अपार कष्ट,मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आज आपल्या मेहनतीच्या जोरावर अभिनेत्री विद्या बालन कोट्यवधींची मालकीण आहे. सीए नॉलेजनुसार, विद्या बालनची एकूण संपत्ती 18 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 136 कोटी रुपये आहे.