छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात बॉलिवूड अभिनेत्याने केलं विंटेज फोटोशूट; सोबत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 18:09 IST2026-04-17T17:11:49+5:302026-04-17T18:09:01+5:30

मुंबईतील रस्त्यांवर बॉलिवूड अभिनेत्याने केलेलं चांगलंच व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्यासोबत एका मराठी अभिनेत्रीला पाहून सर्वजण थक्क झाले आहेत

मुंबईतील रस्त्यांवर बॉलिवूड अभिनेत्याने केलेलं चांगलंच व्हायरल झालं आहे. हा अभिनेता म्हणजे विजय वर्मा. विजयने केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

पांढरे कपडे, डोळ्यांवर काळा चष्मा या अवतारात विजय वर्माने हे खास फोटोशूट केलं आहे. आगामी 'मटका किंग' वेबसीरिजच्या प्रमोशननिमित्ताने विजयने हे खास फोटोशूट केलंय.

हातात पत्त्यांचा कार्ड घेऊन, विंटेज कारमध्ये बसून विजयने हे खास फोटोशूट केलंय. विजयचा स्वॅग प्रत्येक फोटोत पाहायला मिळतोय.

विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये विजयसोबत अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाच्या साडीत सईचं सौंदर्य खुलुन आलं आहे

विजयने विंटेज कार चालवून सर्वांचं लक्ष वेधलंय. 'मटका किंग' मध्ये विजयने जी भूमिका साकारली आहे त्याच खास लूकमध्ये विजय पाहायला मिळतोय.

विजय जी गाडी चालवत आहे त्या गाडीवरही 'मटका किंग' असं लिहिलेलं दिसतंय. एकूणच 'मटका किंग' वेबसीरिजचं जोरदार प्रमोशन झालेलं दिसतंय.

मुंबईच्या रस्त्यावर ओटीटी स्टार विजयने केलेलं हे फोटोशूट सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय आहे. 'मटका किंग' वेबसीरिजचं दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केलं आहे.