अग्गंबाई सूनबाई..! आलिया भट आहे 'कपूर घराण्यातील' ११वी सून, जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्रीच्या जाऊबाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 02:24 PM2022-04-13T14:24:19+5:302022-04-13T14:41:20+5:30

Kapoor Family: कपूर घराणे हे बॉलिवूडमधील सर्वात मोठे फिल्मी कुटुंब आहे.या कुटुंबातील जवळपास ३० जणांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. आलिया भट(Alia Bhatt)चेही नाव लवकरच कपूर कुटुंबाशी जोडले जाणार आहे.

कपूर घराणे (Kapoor Family) हे बॉलिवूडमधील सर्वात मोठे फिल्मी कुटुंब आहे. या कुटुंबातील ५ पिढ्या १९२८ पासून आतापर्यंत भारतीय चित्रपट उद्योगाशी निगडीत आहेत. पृथ्वीराज कपूर हे या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी सर्वात आधी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

या कुटुंबातील जवळपास ३० जणांनी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. आलिया भट(Alia Bhatt)चेही नाव लवकरच कपूर कुटुंबाशी जोडले जाणार आहे. 'नवाब फॅमिली'नंतर आता 'कपूर फॅमिली' लवकरच 'भट फॅमिली'सोबत नातेसंबंध बनवणार आहे.

बॉलिवूड अभिनेता पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) यांनी रामसरानी मेहरासोबत लग्न केले. त्यांना राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर आणि उर्मिला कपूर ही चार मुले होती.

बॉलिवूड अभिनेता राज कपूर (Raj Kapoor) यांनी कृष्णा मल्होत्रासोबत लग्न केले. त्यांना रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, रतु नंदा आणि रीमा जैन अशी तीन मुले आणि 2 मुली आहेत.

बॉलिवूड अभिनेता शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांनी १९५५ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री गीता बालीसोबत लग्न केले. शम्मी-गीता यांना आदित्य राज कपूर आणि कांचन केतन देसाई ही दोन मुले आहेत. गीताच्या मृत्यूनंतर शम्मी कपूरने नीला देवीसोबत दुसरे लग्न केले.

बॉलिवूड अभिनेते शशी कपूर (Shashi Kapoor) यांनी इंग्लिश अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत लग्न केले. त्यांना करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुलं आहेत.

बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी बॉलिवूड अभिनेत्री बबिता यांच्यासोबत लग्न केले. रणधीर आणि बबिता यांना करिश्मा कपूर आणि करीना कपूर या दोन मुली आहेत.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीतू सिंग(Nitu Singh) यांच्यासोबत लग्न केले. ऋषी आणि नीतू यांना रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी ही दोन मुले आहेत.

बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांनी आरती सभरवालसोबत लग्न केले. त्यांना मूलबाळ नाही, लग्नानंतर लगेचच त्यांचा घटस्फोट झाला.

शम्मी कपूर यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता आदित्य राज कपूर (Aditya Raj Kapoor) यांनी प्रीती कपूर यांच्यासोबत लग्न केले. आदित्य आणि प्रीती यांना विश्व कपूर आणि तुलसी कपूर ही दोन मुले आहेत.

शशी कपूर यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी शीना सिप्पी यांच्यासोबत लग्न झाले आहे. कुणाल आणि शीना यांना जहान पृथ्वीराज कपूर आणि शायरा लॉरा कपूर ही दोन मुले आहेत.

बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर (Karan Kapoor) यांचे लग्न लोर्ना कपूर यांच्यासोबत झाले आहे. करण आणि लोर्ना यांना आलिया कपूर आणि जॅक कपूर ही दोन मुले आहेत.

कपूर कुटुंबातील सदस्य रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या महिन्यात १४ ते १७ एप्रिल दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)सोबत लग्न करणार आहे. अशाप्रकारे आलिया कपूर घराण्याची ११वी सून होणार आहे.