"अन्न खाताना किमान..."; ५५ वर्षीय आर.माधवनने सांगितला सोपा पण महत्वाचा फिटनेस फंडा, वजन वाढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 18:32 IST2026-05-02T18:12:21+5:302026-05-02T18:32:29+5:30

कोणत्याही वर्कआउटशिवाय केवळ आपल्या जीवनशैलीत बदल करून माधवनने स्वतःला ट्रान्सफॉर्म केले आहे. याशिवाय खाणं खातानाचे खास फंडे आर.माधवनने सांगितले आहेत. हे फंडे आपल्या प्रत्येकाच्या घरी आजी-आजोबांनी सांगितले असतील

आर. माधवन हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो वयाच्या ५५ व्या वर्षीही अत्यंत फिट आणि तरुण दिसतो

कोणत्याही वर्कआउटशिवाय केवळ आपल्या जीवनशैलीत बदल करून स्वतःला ट्रान्सफॉर्म केले आहे. याशिवाय खाणं खातानाचे खास फंडे आर.माधवनने सांगितले आहेत. हे फंडे आपल्या प्रत्येकाच्या घरी आजी-आजोबांनी सांगितले असतील

माधवन आपले अन्न किमान ४५ ते ६० वेळा चावून खातो. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्नातील पोषक तत्वे शरीराला नीट मिळतात.

संध्याकाळी ६.४५ च्या दरम्यान आर. माधवन आपलं जेवण आटपतो. याशिवाय दुपारी ३.३० नंतर तो फक्त शिजवलेले पदार्थ खातो. कच्चं काहीच खात नाही.

दिवसभरात आर. माधवन भरपूर पाणी पितो. याशिवाय पचनक्रिया आणखी चांगली करण्यासाठी तो पालेभाज्या आवर्जून खातो.

माधवन दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेण्यावर भर देतो. शरीर पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक असल्याचे तो मानतो. याशिवाय सकाळी उठल्यावर जिमला न जाता तो चालण्यावर भर देतो.

झोपण्यापूर्वी एक-दीड तास तो मोबाईलला दूर ठेवतो. अशाप्रकारे आर.माधवन स्वतःच्या फिटनेसला प्राधान्य देतो.