३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला होता हा मराठी सिनेमा; तुम्ही ओळखू शकता का त्याचं नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 15:02 IST2024-01-29T15:01:42+5:302024-01-29T15:02:19+5:30

Marathi cinema: या सिनेमातील डायलॉग्स आजही लोकप्रिय आहेत.

This Marathi movie was released 35 years ago Did you recognize his name? | ३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला होता हा मराठी सिनेमा; तुम्ही ओळखू शकता का त्याचं नाव?

३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला होता हा मराठी सिनेमा; तुम्ही ओळखू शकता का त्याचं नाव?

मराठी कलाविश्वात आज असंख्य सिनेमांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. परंतु, या सिनेमांच्या गर्दीत असे काही चित्रपट आहेत जे वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. यात खासकरुन ८०-९०च्या काळातील सिनेमा प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. यात मुख्यत्वेकरुन लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर या कलाकारांच्या सिनेमांना आजही प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जुन्या सिनेमातील फोटो व्हायरल होत आहे. हा सिनेमा जवळपास ३५ वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि आजही त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.

सोशल मीडियावर सध्या काही मराठी कलाकारांचा ग्रुप फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, शंतनू रे, सुप्रिया पिळगांवकर आणि निवेदिता सराफ, विजू खोटे ही दिग्गज कलाकार मंडळी दिसून येत आहे. हा फोटो अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी शेअर केला असून तो नेटकऱ्यांमध्ये वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

दिग्गज कलाकारांचा हा फोटो पाहिल्यानंतर हा फोटो कोणत्या सिनेमाच्या सेटवरचा असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर, काही नेटकऱ्यांनी या सिनेमाचं नाव बरोबर ओळखलं आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा आजही टीव्हीवर अनेकदा लागतो. केवळ दाखवलाच जात नाही तर त्याची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. या सिनेमातील प्रत्येक संवाद, प्रसंग अनेक प्रेक्षकांना तर तोंडपाठ आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर चर्चेत येत असलेला हा ३५ वर्षांपूर्वीचा फोटो एका गाजलेल्या मराठी सिनेमाच्या सेटवरचा आहे. हा सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी. हा सिनेमा मराठी कलाविश्वातील सुपरहिट सिनेमा म्हणून ओळखला जातो.
 

Web Title: This Marathi movie was released 35 years ago Did you recognize his name?