प्रेक्षकांमधून सर्वात जोरात शिट्टी वाजवणारा तो बाबाच! रितेशचा फोटो शेअर करत जिनिलिया म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 16:43 IST2024-03-26T16:42:54+5:302024-03-26T16:43:27+5:30

रियान आणि राहील दोघांनाही वडिलांप्रमाणेच फुटबॉलची आवड आहे.

Riteish Deshmukh Cheer for his children who participated in football match | प्रेक्षकांमधून सर्वात जोरात शिट्टी वाजवणारा तो बाबाच! रितेशचा फोटो शेअर करत जिनिलिया म्हणाली...

प्रेक्षकांमधून सर्वात जोरात शिट्टी वाजवणारा तो बाबाच! रितेशचा फोटो शेअर करत जिनिलिया म्हणाली...

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia)  म्हणजेच महाराष्ट्राचे दादा-वहिनी. सिनेमासोबतच त्यांचे सोशल मीडियावरील कंटेंट सगळेच एन्जॉय करतात. तसंच त्यांचे दोन्ही मुलं रियान आणि राहीलही नेहमी लक्ष वेधून घेतात. दोघांवर जे चांगले संस्कार झाले आहेत त्याचं नेहमीच कौतुक होतं. रियान आणि राहील दोघांनाही वडिलांप्रमाणेच फुटबॉलची आवड आहे. त्यांच्या फुटबॉल सामन्यात चिअर करायला रितेश-जिनिलियाने हजेरी लावली होती. यासंदर्भात जिनिलियाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

जिनिलियाने रितेशचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तो प्रेक्षकांमध्ये बसला असून शिट्टी वाजवत मुलांना चिअर करताना दिसतोय. ती लिहिते, "रितेश नेहमी मुलांना म्हणतो की प्रेक्षकांमधून सर्वात जोरात शिट्टी वाजवणारा तुमचा बाबाच असेल आणि तो नेहमीच तुम्हाला दिलेला शब्द पाळेल. इतक्या लवकर आपला ७ वर्षांचा आणि ९ वर्षांचा मुलगा इतक्या प्रतिष्ठित फुटबॉल टीमचं प्रतिनिधित्व करतील असा मी विचारही केला नव्हता. पण मी तक्रार करत नाहीए विशेषकरुन जेव्हा तुम्ही वंदे मातरम ऐकता."

रितेश जिनिलिया कायम आपल्या मुलांना साधं राहायला शिकवतात. अनेकदा ते  त्यांच्या लातूर गावातील घरीही जातात. तसंच पापाराझींसमोर रियान आणि राहील ज्यापद्धतीने नमस्कार करतात तेव्हा मराठी लोकांना जाम अभिमान वाटतो. काहीच दिवसात आईवडिलांप्रमाणेच या दोघांचीही क्रेझ वाढणार आहे यात दुमत नाही.  

Web Title: Riteish Deshmukh Cheer for his children who participated in football match