"आता कुस्ती south सोबत...",'एप्रिल मे ९९' पाहून संतोष जुवेकरची पोस्ट; म्हणाला- "मराठी सिनेमा षड्डू ठोकून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:17 IST2025-05-26T12:16:00+5:302025-05-26T12:17:36+5:30

"मराठी सिनेमा षड्डू ठोकून...", 'एप्रिल मे ९९' सिनेमाबद्दल संतोष जुवेकर काय म्हणाला?

marathi cinema actor santosh juvekar share special post for april may 99 movie on social media | "आता कुस्ती south सोबत...",'एप्रिल मे ९९' पाहून संतोष जुवेकरची पोस्ट; म्हणाला- "मराठी सिनेमा षड्डू ठोकून..."

"आता कुस्ती south सोबत...",'एप्रिल मे ९९' पाहून संतोष जुवेकरची पोस्ट; म्हणाला- "मराठी सिनेमा षड्डू ठोकून..."

Santosh Juvekar: उन्हाळ्याच्या सुट्टींचा तसेच बालपणातील गोड मैत्रीची आठवण करुन देणारा 'एप्रिल मे ९९' (April May 99 Movie) हा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होताना दिसते. शिवाय सिनेप्रेमींची देखील चित्रपटाला पसंती मिळते आहे. त्यात आता एप्रिल मे ९९ चित्रपटाबद्दल अभिनेता संतोष जुवेकरने खास पोस्ट शेअर करुन संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 


संतोष जुवेकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय की, "अरे! मी काल छानश्या ट्रिपला जाऊन आलो. ते "एप्रिल मे ९९" ट्रॅव्हल्स चे मालक आहेत रोहन मापुस्कर त्यांनीना मला माझ्या आठवणीतल्या गावाला नेऊन आणलं आणि तिकडे मला सगळे भेटले, अगदी सगळ्या त्या क्षणांसहित जे मी अजूनही माझ्या जपले आहेत. तुम्हांला तुमच्या आठवणींना एकदा जिवंत पाहिचय? मग ह्या #aprilmay९९ च्या ट्रीपला plzzz जाउन या.  ता. क - एप्रिल मे ९९..., आपला मराठी सिनेमा थेटरात जाऊन बघाच.... आपला मराठी सिनेमा आता करकचून फेटा बांधून त्याच्या पिळदार मिश्यांना ताव देत आणि षड्डू ठोकून उभा राहतोय त्याला आता फक्त लढ म्हणा. (तुमची साथ असुदे महाराजा.)" 

यापुढे अभिनेत्याने लिहिलंय, "आता कुस्ती south सोबत, अजून एक ता. क -- हे दोघं भाऊ एक तो राजेश आणि एक हा रोहन.... वेड....... वेवेवेवे आहेत. (इमोशनल आत्याचारी), ये राजेश दादा ये रोहन्या तुम्हांला कस टांगायच (tag करायच) तेवढं plz call करून सांगा. मी वाट बघतोयरे कावळ्यानो...", अशी मजेशीर पोस्ट लिहून संतोष जुवेकरने दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्या कामाची स्तुती केली आहे. 

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

Web Title: marathi cinema actor santosh juvekar share special post for april may 99 movie on social media