तुझ्या रुपानं वेड लावलं...; किशोरी शहाणे यांनाही आवरला नाही मोह, ट्रेंडिग गाण्यावर अभिनेत्रीचा लेकासोबत जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 16:17 IST2026-04-18T16:12:13+5:302026-04-18T16:17:39+5:30

किशोरी शहाणे यांनीही फॉलो केला ट्रेंड;'तुझ्या रुपानं वेड लावलं' गाण्यावर मुलासोबत धरला ठेका, व्हिडीओ बघाच 

marathi actress kishori shahane dance on tujhya rupan ved lavala song with son bobby video goes viral​​​​​​​ | तुझ्या रुपानं वेड लावलं...; किशोरी शहाणे यांनाही आवरला नाही मोह, ट्रेंडिग गाण्यावर अभिनेत्रीचा लेकासोबत जबरदस्त डान्स

तुझ्या रुपानं वेड लावलं...; किशोरी शहाणे यांनाही आवरला नाही मोह, ट्रेंडिग गाण्यावर अभिनेत्रीचा लेकासोबत जबरदस्त डान्स

Kishori Shahane And Son Bobby Dance Video: सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंडिंग होत असतात. हल्ली सोशल मीडियावर एखादं गाण्याचा ट्रेंड सुरु झाला की त्यावर रिल्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. सध्या इंटरनेटवर 'बाई मला गं वेड लावलं, तुझ्या रुपानं वेड लावलं' हे गाणं चांगलच ट्रेंडिंगवर आहे. काही दिवसांपूर्वीच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. अगदी मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत तसेच सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रिल्स, व्हिडीओ बनवून थिरकताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर  एका मराठी अभिनेत्रीचा या गाण्यावरील डान्स व्हिडीओ व्हायर होत आहे.या अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनीही 'तुझ्या रुपानं वेड लावलं' गाण्यावर रील बनवले आहेत. आता अभिनेत्री किशोरी शहाणेंना देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. 


दरम्यान, सोशल मीडियावर  'तुझ्या रुपानं वेड लावलं' या गाण्याने अक्षरश धुमाकूळ घातला आहे. अशातच या व्हायरल गाण्यावर अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी त्यांचा मुलगा बॉबीसोबत ठेका धरला आहे. लाल रंगाची साडी परिधान करून या गाण्यावर त्या जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. तसेच आपल्या अदाकारीने नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.  नुकताच सोशल मीडियावर किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी विजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. "डान्स जोडी बऱ्याच काळानंतर परतली आहे, वेड लावलं...", असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान, किशोरी शहाणे यांचा हा डान्स पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही त्यांचा डान्स एखाद्या २० वर्षाच्या तरुणीला लाजवेल असा आहे. 

या व्हायरल व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी या मायलेकाच्या जोडीचं कौतुक केलं आहे. एकाने लिहिलंय, "या वयात पण एनर्जी खूपच झक्कास." तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, "माय लेक लय भारी...", अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Web Title : किशोरी शहाणे का बेटे के साथ ट्रेंडिंग गाने पर वायरल डांस

Web Summary : अभिनेत्री किशोरी शहाणे और उनके बेटे बॉबी विज का ट्रेंडिंग गाने 'तुझ्या रूपाना येड लावला' पर डांस वीडियो वायरल हो गया है। मां-बेटे की ऊर्जावान परफॉर्मेंस को ऑनलाइन प्रशंसकों से खूब प्यार और प्रशंसा मिल रही है।

Web Title : Kishori Shahane's Viral Dance with Son on Trending Song

Web Summary : Actress Kishori Shahane and her son Bobby Vij's dance video on the trending song 'Tujhya Rupana Yed Lavala' has gone viral. The mother-son duo's energetic performance is receiving much love and appreciation from fans online.