'नाहीतर राजेश खन्ना सारखी परिस्थिती निर्माण होते'; वैभव मांगलेच्या मार्मिक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 12:58 IST2023-06-11T12:57:15+5:302023-06-11T12:58:24+5:30

Vaibhav mangle: वैभव मांगलेने फेसबुकवर ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

marathi actor vaibhav mangle shared thoughts about the actor | 'नाहीतर राजेश खन्ना सारखी परिस्थिती निर्माण होते'; वैभव मांगलेच्या मार्मिक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

'नाहीतर राजेश खन्ना सारखी परिस्थिती निर्माण होते'; वैभव मांगलेच्या मार्मिक पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेता म्हणजे वैभव मांगले (vaibhav mangle) . आजवरच्या कारकिर्दीत अनेक सिनेमा, नाटक, मालिकांमध्ये काम केलेले वैभव मांगले सध्या 'चंद्रविलास' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. कलाविश्वात सक्रीय असलेला वैभव सोशल मीडियावरही सक्रीय असून अलिकडेच त्यांनी कलाकारांविषयी एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे.

“अभिनेता हा घर बांधणाऱ्या गवंड्यासारखा असतो…. भूमिका बांधतो पण त्यात राहता येत नाही,” असं म्हणत वैभव मांगलेने फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. वैभवची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

काय म्हणाले नेटकरी?

 'त्याने त्या आविर्भावात राहू पण नये की मी या किंवा अशाच भूमिका करण्यासाठी जन्म घेतला आहे म्हणून. नाहीतर राजेश खन्ना सारखी परिस्थिती निर्माण होते. घर बदलत राहणे केव्हाही उत्तम', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, भुमिकारूपी घरात तो काही काळा पुरता रहातच असतो,..., चांगल्या गवंड्याच घर अधिक काळ टिकत अशा कितीतरी कमेंट नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, वैभव मांगले सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे कलाविश्वाशी निगडीत अनेक पोस्ट तो वरचेवर शेअर करत असतो. अलिकडेच त्याने  नाट्यगृहातील गैरसोयीविषयी भाष्य केलं होतं.

Web Title: marathi actor vaibhav mangle shared thoughts about the actor