"साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी...", संतोष जुवेकरने शेअर केला मराठीतील दिग्गजांसोबतचा फोटो, म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:25 IST2025-05-30T17:20:55+5:302025-05-30T17:25:37+5:30

अभिनेता संतोष जुवेकर हा मागील काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत होता.

marathi cinema actor santosh juvekar share special photo with ashok saraf vikram gokhale and mahesh manjrekar netizens react | "साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी...", संतोष जुवेकरने शेअर केला मराठीतील दिग्गजांसोबतचा फोटो, म्हणाला... 

"साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी...", संतोष जुवेकरने शेअर केला मराठीतील दिग्गजांसोबतचा फोटो, म्हणाला... 

Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) हा मागील काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत होता. विकी कौशल स्टारर 'छावा' चित्रपटामुळे तो चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. दरम्यान, संतोष जुवेकर हा त्याच्या अभिनयाने जसं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो, तसाच तो सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओमुळे चाहत्यांचं लक्ष वेधत असतो. नुकताच त्याने मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्यांसोबतचा खास फोटो पोस्ट केला. त्याच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. 


संतोष जुवेकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मराठी अभिनेते अशोक सराफ, विक्रम गोखले तसेच शिवाजी साटम, महेश मांजरेकर आणि सतीश आळेकर यांच्यासोबतचा खास आठवणीतला फोटो शेअर केला आहे. या पोस्टला अभिनेत्याने दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. संतोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर करत लिहिलंय की, "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!!" वालं feeling आहे ना या फोटोत. मग कायमच " रहे मैदानमें आगे" साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी उभे आहेत असं वाटतं. (आठवणीतल्या साठवणीतला फोटो)....", असं लिहून त्याने या कलाकारांविषयी मनातील आदरभाव व्यक्त केला आहे. 

दरम्यान, संतोष जुवेकरच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांसह अनेकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने त्याच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय, "तुझं काम बोलतंय , चालू दे भाई... तू बेस्ट होतास आणि आहेस..झेंडा , मोरया म्हणजे तुझ्या अभिनयाचे कळस आहेत.. लोकांचं काय , आईबापाला ही नीट बोलत नाहीत , ते तुला काय ओळखणार , तू तुझ्या कामातून उत्तर दे , कायम तुझ्या सोबत आहोत." तर आणखी एका यूजरने म्हटलंय, "तुमच्या पाठीशी एकदम दिग्गज अन् उत्तम असे कलाकार उभे आहेत..भारी..,", असं म्हणत काहींनी अभिनेत्याचं कौतुक देखील केलं आहे. 

Web Title: marathi cinema actor santosh juvekar share special photo with ashok saraf vikram gokhale and mahesh manjrekar netizens react