तुमच्या आवडत्या कलाकाराने कोणती घेतली होती पहिली कार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 10:32 IST2018-04-28T16:45:31+5:302018-04-29T10:32:06+5:30

बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. त्यांच्या घरांपासून ते त्यांचे कपडे आणि त्यांच्या गाड्यांबद्दल सर्वांना जाणून घ्यायचं असतं.

Famous Bollywood Stars With Their First Cars | तुमच्या आवडत्या कलाकाराने कोणती घेतली होती पहिली कार?

तुमच्या आवडत्या कलाकाराने कोणती घेतली होती पहिली कार?

(All Images Credit: www.movified.com)

बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. त्यांच्या घरांपासून ते त्यांचे कपडे आणि त्यांच्या गाड्यांबद्दल सर्वांना जाणून घ्यायचं असतं. आता बॉलिवूडच्या कलाकारांकडे महागड्या कंपन्यांच्या महागड्या कार्स असतील पण त्यांनी घेतलेली पहिली कार कोणती होती हे फार क्वचितच लोकांना माहीत असेल. त्यामुळेच तुमच्या आवडत्या कलाकारांनी पहिली कार कोणती घेतली होती, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1) अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कार कलेक्शनमध्ये आता करोडोंच्या कार्स आहेत. त्यांच्याकडे आज 20 पेक्षा जास्त कार्स आहेत. पण त्यांची पहिली कार कोणती होती हे कुणालाच माहिती नाही. अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्तानी सिनेमा रिलीज झाल्यावर एक सेकंड हॅन्ड फियाट कार विकत घेतली होती. 

2) शाहरुख खान

किंग ऑफ बॉलिवूड अशी ओळख असलेला शाहरुख खान आज एका राजासारखं लाईफ जगतोय हे काही वेगळं सांगायला नको. शाहरुखकडेही अनेक महागड्या कार्सचं कलेक्शन आहे. पण त्याच्यासाठी त्याची पहिली कारच जास्त खास होती. शाहरुखला मारुती ओमनी ही पहिली कार त्याच्या आईने गिफ्ट केली होती.

3) अक्षय कुमार

अक्षय कुमार हा त्याच्या अॅक्शनसोबतच त्याच्या कार कलेक्शनसाठीही चर्चेत असतो. पण इतक्या महागड्या कार खरेदी करण्यापूर्वी त्याने एक सेकंड हॅन्ड फियाट कार खरेदी केली होती. त्यावेळी त्या कारची किंमत 28 हजार रुपये इतकी होती. 

4) आलिया भट

आलिया भलेही एका स्टार फॅमिलीतून इंडस्ट्रीत आली असेल पण तिने तिच्या स्वत:च्या मेहनतीने आपलं नाव कमवलं आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आलियाने स्वत:ची पहिली कार ही ऑडी घेतली होती. ही कार तिने स्वत:लाच गिफ्ट केली होती. 

5) कंगना राणौत

अभिनेत्री कंगना राणौत ही केवळ 17 वर्षांची असताना बॉलिवूडमध्ये आली होती. काही सिनेमे केल्यानंतर आणि यश मिळाल्यानंतर तिने BMW series 7 ही कार घेतली होती.

6) सलमान खान

सलमान खान हा आधीच स्टार चाईल्ड होता. त्यावेळी त्याचे वडील सलीम खान हे चांगलेच यशस्वी लेखक होते. त्याने त्याची पहिली कार एक हॅन्ड हेराल्ड घेतली होती. हीच कार आधी ऋषी कपूर यांनी वापरली होती.

7) काजोल

काजोल जितका काळ बॉलिवूडमध्ये होती तितक्या काळात तिने नाव आणि पैसा दोन्ही मिळवले होते. काजोलने स्वत: तिच्या पहिल्या कारचा फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. काजोलने पहिली कार मारुती एस्टीम ही घेतली होती. 
 

Web Title: Famous Bollywood Stars With Their First Cars