दोन नव्हे दीपिका पादुकोणला हवीत तीन मुलं! अभिनेत्रीने स्वत:च सांगितलेलं, म्हणाली- "मला खूप मुलं जन्माला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:22 IST2026-04-20T13:22:19+5:302026-04-20T13:22:48+5:30

दुआनंतर दीपिका आणि रणवीर यांच्या घरी पुन्हा चिमुकल्याचं आगमन होणार आहे. पण, दीपिकाला दोन नव्हे तर तीन बाळांची आई व्हायचं आहे.

Deepika Padukone wants three children actress old video gets viral | दोन नव्हे दीपिका पादुकोणला हवीत तीन मुलं! अभिनेत्रीने स्वत:च सांगितलेलं, म्हणाली- "मला खूप मुलं जन्माला..."

दोन नव्हे दीपिका पादुकोणला हवीत तीन मुलं! अभिनेत्रीने स्वत:च सांगितलेलं, म्हणाली- "मला खूप मुलं जन्माला..."

बॉलिवूड कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. दुआनंतर दीपिका आणि रणवीर यांच्या घरी पुन्हा चिमुकल्याचं आगमन होणार आहे. पण, दीपिकाला दोन नव्हे तर तीन बाळांची आई व्हायचं आहे. अभिनेत्रीनेच एका मुलाखतीत बोलताना ही इच्छा व्यक्त केली होती. तिचा जुना व्हिडीओ आता व्हायरल होतो आहे. 

रणवीरशी लग्न करण्याआधी दीपिकाने राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं. दीपिका म्हणाली होती की "मरणाआधी मला एक गोष्ट नक्की करायची आहे ती म्हणजे मला खूप सारी मुलं जन्माला घालायची आहेत. जर मी अभिनेत्री नसते तर कोण असते मला माहीत नाही. पण माझ्या आजूबाजूला माझी छोटी मुलं असती. माझी तीन छोटी छोटी मुलं..इकडे तिकडे पळाली असती. मी आशा करते की माझ्याकडे एवढं काम असेल की माझ्या मुलांना मी शूटिंगला सोबत घेऊन जाईन".


रणवीर आणि दीपिकाने २०१८ मध्ये इटलीत लग्न केलं होतं. लग्नानंतर ६ वर्षांनी दीपिकाने त्यांच्या पहिला बाळाला जन्म दिला. ८ सप्टेंबर २०२४ रोजी रणवीर-दीपिकाला मुलगी झाली. जिचं नाव त्यांनी दुआ असं ठेवलं आहे. त्यानंतर आता पुन्हा ते आईबाबा होण्यासाठी उत्सुक आहेत.  

Web Title : दीपिका पादुकोण को दो नहीं, तीन बच्चे चाहिए!

Web Summary : रणवीर सिंह के साथ अपने दूसरे बच्चे की उम्मीद कर रही दीपिका पादुकोण ने एक बार तीन बच्चे होने की इच्छा व्यक्त की थी। एक पुराने इंटरव्यू में उन्होंने तीन बच्चों के साथ एक हलचल भरे घर और उन्हें शूटिंग पर ले जाने का सपना बताया था। उनकी पहले से ही दुआ नाम की एक बेटी है।

Web Title : Deepika Padukone Wants Three Children, Not Just Two!

Web Summary : Deepika Padukone, expecting her second child with Ranveer Singh, once expressed her desire for three children. An old interview reveals her dream of a bustling home with three kids and taking them to shoots. They already have a daughter named Dua.