कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 11:13 AM2022-05-07T11:13:48+5:302022-05-07T11:14:14+5:30

Kangana Ranaut: कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. तिने कपिल शर्माच्या शोमध्ये सिंगल असण्यामागचे कारण सांगितले होते.

The reason behind Kangana Ranaut being 'single' came to light, the actress herself revealed in Kapil's show | कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

कंगना राणौत 'सिंगल' असण्यामागचं कारण आलं समोर, खुद्द अभिनेत्रीनेच कपिलच्या शोमध्ये केला खुलासा

googlenewsNext

कॉमेडी किंग कपिल शर्मा(Kapil Sharma)चा शो द कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमने कोणतेही अधिकृत विधान जारी केले नसले तरी यादरम्यान शो बंद झाल्याच्या बातम्याही आल्या. आता कपिलच्या शोचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) दिसत आहे. तसेच, व्हिडीओमध्ये कपिल शर्मा नेहमीप्रमाणे त्याची गेस्ट कंगना राणौतसोबत हसताना दिसत आहे.  विनोद करताना दिसत आहे.

आपल्या सर्वांना माहित आहे की कंगना रणौतचे चाहते खूप आहेत आणि प्रेक्षकांना तिच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. कंगना राणौत अजूनही अविवाहित आहे हे सर्वांना माहीत आहे. कपिलच्या शोमध्ये येताना तिने सांगितले की ती अजूनही सिंगल का आहे. वास्तविक, 'द कपिल शर्मा शो'मध्ये एका चाहत्याने कंगनाला विचारले होते की, 'तू इतकी सुंदर असूनही सिंगल का आहेस?' या प्रश्नावर कंगनाने कपिल शर्मा आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली- 'तेही विवाहित आहेत, इथे सर्व विवाहित आहेत.' यावर चाहत्याने मी सिंगल असल्याचे सांगितले. कंगना चाहत्याचे बोलणे ऐकून हसायला लागली.

कंगना राणौतचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या तिच्या 'क्वीन' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना येथे पोहोचली होती. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त राजकुमार राव आणि लिसा हेडन देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'क्वीन' चित्रपटाच्या यशानंतर कंगनाचा चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाला.

Web Title: The reason behind Kangana Ranaut being 'single' came to light, the actress herself revealed in Kapil's show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.