विना हेल्मेट बाईक चालवणं तापसी पन्नूला पडले भारी, भरावा लागला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 16:09 IST2020-11-20T16:01:28+5:302020-11-20T16:09:50+5:30

तापसीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Taapsee Pannu paid fine riding a bike without a helmet | विना हेल्मेट बाईक चालवणं तापसी पन्नूला पडले भारी, भरावा लागला दंड

विना हेल्मेट बाईक चालवणं तापसी पन्नूला पडले भारी, भरावा लागला दंड

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या वेगळ्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. सध्या ती तिच्या 'रश्मि रॉकेट' या स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाच्या तयारी करतेय.  तापसीने यासाठी केवळ वजन कमी केले नाही, तर भूमिकेमध्ये फिट बसण्यासाठीही जीवतोडून मेहतन केली आहे. दरम्यान, तापसीने बुधवारी तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला जो चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. यात ती बाईक चालवताना दिसेतय, तीही हेल्मेटशिवाय. विशेष म्हणजे यासाठी चालनादेखील कापले गेले आहे.

फोटो पोस्ट करताना तापसीने लिहिले, 'विना हेल्मेट चालान कापण्यापूर्वी.' आपल्याला बाईक फार आवडता असल्याचेही तापसीने नमूद केले आहे.


तापसी रश्मि रॅकेटमध्ये एक अविश्वसनीय वेगवान धावपटूची भूमिका साकारणार आहे. तिला गावातील लोक 'रॉकेट' म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते. 'रश्मि रॉकेट' 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Taapsee Pannu paid fine riding a bike without a helmet