श्रद्धा-फरहानचे सिक्रेट अफेअर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 14:19 IST2016-05-17T08:49:11+5:302016-05-17T14:19:11+5:30

अभिनेता फरहान अख्तरचा घटस्फोट झाल्यापासूनच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहानच्या नात्याविषयी चर्चा सुरू आहे. फरहान आणि अधुनाच्या घटस्फोटासाठी श्रद्धाच ...

Shraddha-Farhan's Secret Affairs? | श्रद्धा-फरहानचे सिक्रेट अफेअर?

श्रद्धा-फरहानचे सिक्रेट अफेअर?

िनेता फरहान अख्तरचा घटस्फोट झाल्यापासूनच अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहानच्या नात्याविषयी चर्चा सुरू आहे. फरहान आणि अधुनाच्या घटस्फोटासाठी श्रद्धाच जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. फरहान आणि श्रद्धाने रॉक ऑन २ चित्रपटात एकत्र काम केले होते. या सगळ्या चर्चा सुरू असताना त्यांच्या नात्याविषयी आणखी एक बातमी आली आहे. एका वृत्तपत्रानुसार बागी या श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीला फरहान आणि श्रद्धाने एकमेकांसोबत डान्सही केला. या पार्टीला श्रद्धाचे वडील शक्ती कपूरही उपस्थित होते. ते पार्टीतून गेल्यानंतर श्रद्धाची नजर थोडीही फरहानपासून दूर जात नव्हती असे म्हटले जात आहे. तसेच ते दोघे पार्टी संपल्यावरही एकाच गाडीतून घरी गेले. हे सगळे पाहाता दाल में कुछ काला है अशीच सध्या चर्चा सुरू आहे. 

Web Title: Shraddha-Farhan's Secret Affairs?