"छावा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस यशानंतर..."; रश्मिका मंदानाचं मोठं विधान, सर्वजण थक्क झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:36 IST2026-05-18T12:29:12+5:302026-05-18T12:36:04+5:30

रश्मिका मंदाना आणि विकी कौशल यांचा 'छावा' चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात रश्मिकाने छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारली होती.

Rashmika Mandanna big statement on chhaava movie box office collection that everyone was shocked | "छावा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस यशानंतर..."; रश्मिका मंदानाचं मोठं विधान, सर्वजण थक्क झाले

"छावा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस यशानंतर..."; रश्मिका मंदानाचं मोठं विधान, सर्वजण थक्क झाले

रश्मिका मंदाना आणि विकी कौशल यांचा 'छावा' चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात रश्मिकाने छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे रश्मिकाला खूप प्रसिद्धी मिळाली. नुकतंच रश्मिका ‘कॉकटेल २’ चित्रपटाच्या लाँचला सहभागी झाली होती. अभिनेता शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला आगामी चित्रपट ‘कॉकटेल २’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या साँग लाँच सोहळ्यात रश्मिकाने छावाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे.

‘कॉकटेल २’ कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कृती सेनॉन मॅडॉक फिल्म्ससोबतच्या तिच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलत होती. कृती म्हणाली, "मी मॅडॉक फिल्म्ससोबत आतापर्यंत जवळपास सात चित्रपट केले आहेत आणि हा माझा आठवा चित्रपट आहे. मला येथे काम करायला खूप आवडते आणि कदाचित त्यांनाही माझ्यासोबत काम करायला आवडत असावे."




कृतीचे हे बोलणे ऐकताच रश्मिकाने लगेचच फिरकी घेत म्हटले, "नाही नाही, मला वाटते की 'छावा' चित्रपटाच्या दणदणीत बॉक्स ऑफिस कलेक्शननंतर आता त्यांची पसंती थोडी बदलली आहे." रश्मिकाचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वांमध्ये हशा पिकला आणि कृती देखील काही क्षणांसाठी थक्क झाली.

'छावा' चित्रपटाबद्दल

'छावा' हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आणि धैर्यावर आधारित एक भव्य ऐतिहासिक चित्रपट आहे, ज्यामध्ये अभिनेता विक्की कौशल याने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून, यात रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दणदणीत कमाई करत यशाचे अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले. भव्य युद्ध प्रसंग, उत्कृष्ट अभिनय आणि खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली.

Web Title : 'छावा' की सफलता के बाद रश्मिका मंदाना के बयान से सब हैरान

Web Summary : 'छावा' की सफलता के बाद, रश्मिका ने 'कॉकटेल 2' कार्यक्रम में मजाक किया कि फिल्म की बॉक्स ऑफिस सफलता ने शायद मैडॉक फिल्म्स की प्राथमिकताओं को बदल दिया है, जिससे कृति सैनन कुछ समय के लिए स्तब्ध रह गईं। 'छावा' छत्रपति संभाजी महाराज की वीरता पर आधारित है।

Web Title : Rashmika Mandanna's statement after 'Chhava' success stuns everyone.

Web Summary : Following 'Chhava's' success, Rashmika joked at a 'Cocktail 2' event that the film's box office success might have changed Maddock Films' preferences, leaving Kriti Sanon momentarily stunned. 'Chhava' is based on Chhatrapati Sambhaji Maharaj's valor.