Boney Kapoor: हे वागणं बरं नव्हं! गिगीसोबतचा बोनी कपूर यांचा फोटो पाहून नेटकरी भडकले, काय आहे भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:57 PM2023-04-04T17:57:59+5:302023-04-04T18:17:19+5:30

Boney Kapoor, Gigi Hadid : होय, अमेरिकेची फॅशन मॉडेल गिगी हदीदमुळे बॉलिवूड निर्माता बोनी कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत....

Netizens Troll Boney Kapoor Slammed For Holding Gigi Hadid's Waist While Posing At NMAC | Boney Kapoor: हे वागणं बरं नव्हं! गिगीसोबतचा बोनी कपूर यांचा फोटो पाहून नेटकरी भडकले, काय आहे भानगड

Boney Kapoor: हे वागणं बरं नव्हं! गिगीसोबतचा बोनी कपूर यांचा फोटो पाहून नेटकरी भडकले, काय आहे भानगड

googlenewsNext

Boney Kapoor, Gigi Hadid : अंबानी कुटुंबाच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतच्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. शाहरूख खानपासून आमिर खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा, निक जोनास असे सगळे यावेळी हजर होते. पण सर्वाधिक लक्ष वेधलं ते हॉलिवूड स्टार गिगी हदीदने. होय, अमेरिकेची फॅशन मॉडेल गिगीची जोरदार चर्चा झाली. अजूनही ही चर्चा थांबायची चिन्हं नाहीत. वरूण धवने डान्स करताना गिगीला अचानक उचलून घेतलं अन् तिच्या गालावर किस केलं. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि वरूण धवन प्रचंड ट्रोल झाला. आता गिगीमुळे बॉलिवूड निर्माता बोनी कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.

 

होय,  बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबरचा गिगीचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोत बोनी कपूर यांनी गिगीच्या कमरेवर हात ठेवला आहे. फोटो तसा कॅज्युअल आहे. पण ट्रोलर्सला बोनी कपूर यांचं वागणं आवडलं नाही. मग काय अनेकांनी फोटो पाहून बोनी कपूर यांना ट्रोल करायला सुरूवात केली.
 काका तुमचा हात बाजूला करा, अशी कमेंट एका युजरने केली. शरीर म्हातारं झालंय पण मन अजूनही टवटवीत आहे, अशा शब्दांत काहींनी त्यांची खिल्ली उडवली. 

याआधी वरूण धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत वरुण धवन डान्स करत असताना गिगीला स्टेजवर बोलवतो आणि तिला उचलून घेतो. इतकंच नाही तर उचलून घेतल्यानंतर तिला खाली उतरवत असताना तिच्या गालावर किस करतो. वरुण धवनच्या या वागण्यामुळे गिगी अवघडते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी वरुणला चांगलंच झापलं होतं. वरुण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं अनेकांनी त्याला सुनावलं होतं. हे प्रकरण इतकं वाढलं की, वरूणला याप्रकरणी खुलासा करावा लागला होता. हे सर्व प्लॅन्ड होतं, असं त्यानं म्हटलं होते.

Web Title: Netizens Troll Boney Kapoor Slammed For Holding Gigi Hadid's Waist While Posing At NMAC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.