Nayanthara : नयनताराने भरकार्यक्रमात सांगितली जुळ्या मुलांची नावं; पहिल्यांदाच दाखवला चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:29 PM2023-04-03T17:29:18+5:302023-04-03T17:30:18+5:30

Nayanthara : आत्तापर्यंत नयनताराने आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा दाखवला नव्हता, त्यांच्या नावांचाही खुलासा केला नव्हता. पण आता तिने आपल्या जुळ्या मुलांची नावं जगजाहीर केली आहेत. त्यांचा चेहराही दाखवला आहे.  

Nayanthara Finally Revealed Her Twins Boys Name On Stage Jawan Actress Video Goes Viral On Internet | Nayanthara : नयनताराने भरकार्यक्रमात सांगितली जुळ्या मुलांची नावं; पहिल्यांदाच दाखवला चेहरा

Nayanthara : नयनताराने भरकार्यक्रमात सांगितली जुळ्या मुलांची नावं; पहिल्यांदाच दाखवला चेहरा

googlenewsNext

साउथ सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022 रोजी लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर चारच महिन्यात दोघं जुळ्यांचे आईबाबा झालेत. सरोगसीद्वारे त्यांनी दोन मुलांना जन्म दिला. नयनताराने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. आत्तापर्यंत नयनताराने आपल्या जुळ्या मुलांचा चेहरा दाखवला नव्हता, त्यांच्या नावांचाही खुलासा केला नव्हता. पण आता तिने आपल्या जुळ्या मुलांची नावं जगजाहीर केली आहेत. त्यांचा चेहराही दाखवला आहे.  
नुकतीच नयनतारानं चेन्नईमधील एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमामधील नयनताराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात नयनताराने तिच्या दोन्ही मुलांची नावे अतिशय हटके पद्धतीने उघड केलीत.


आपल्या मुलाच्या नावाची घोषणा करताना नयनताराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नयनताराचे चाहते क्रेझी झाले आहेत. एका चाहत्याने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात ती मुलांची नावे सांगताना दिसते. तर नयनताराच्या एका मुलाचं नाव उयिर रुद्रोनिल एन शिवन आणि दुसऱ्या मुलाचे नाव उलग धैवाग एन शिवन असं आहे.

नयनताराने भरकार्यक्रमात आपल्या दोन्ही मुलांची नावं जाहीर केल्यानंतर लगेच विग्नेशनेही सोशल मीडियावर पोस्ट करत मुलांच्या नावाचा खुलासा केला. मुलांसोबतचे दोन फोटो त्याने शेअर केलेत. यात मुलांचे चेहरेही दिसत आहेत.

९ जून २०२२ रोजी नयनताराने निर्माता दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली होती. या शाही लग्नसोहळ्याची तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. रजनीकांत, शाहरूखसारखे सुपरस्टार्स या लग्नाला हजर होते. लग्न होऊन चार महिने होत नाही तोच, दोघांनी आईबाबा बनल्याची बातमी शेअर केली होती. लवकरच नयनतारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. शाहरूखसोबत जवान या सिनेमात ती झळकणार आहे.
 

Web Title: Nayanthara Finally Revealed Her Twins Boys Name On Stage Jawan Actress Video Goes Viral On Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.