'दंगल गर्ल्स' ने केलं विनेश फोगाटचं कौतुक, फातिमा सना शेख-सान्या मल्होत्राची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 11:23 IST2024-08-07T11:22:34+5:302024-08-07T11:23:43+5:30

अभिनेत्री फातिमा सना शेखने 'दंगल' सिनेमात कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारली. तर सान्याने बबिता फोगाटची भूमिका केली.

Dangal Girls Fatima Sana Shaikh Sanya Malhotra praised wrestler Vinesh Phogat | 'दंगल गर्ल्स' ने केलं विनेश फोगाटचं कौतुक, फातिमा सना शेख-सान्या मल्होत्राची पोस्ट व्हायरल

'दंगल गर्ल्स' ने केलं विनेश फोगाटचं कौतुक, फातिमा सना शेख-सान्या मल्होत्राची पोस्ट व्हायरल

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये काल कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) इतिहास रचला. फायनलपर्यंत धडक मारणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. तिच्या फायनलमध्ये जाण्याने आता भारताचं पदक निश्चित झालं आहे. विनेशचं लक्ष गोल्ड मेडलकडे आहे. आमिर खानचा 'दंगल' सिनेमा फोगाट बहि‍णींवरच आला होता. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांची विनेश ही चुलत बहीण आहे. विनेशच्या या दमदार अचीव्हमेंटवर 'दंगल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) आणि फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) यांनीही पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री फातिमा सना शेखने 'दंगल' सिनेमात कुस्तीपटू गीता फोगाटची भूमिका साकारली. तर सान्याने बबिता फोगाटची भूमिका केली. फातिमा सना शेखने पोस्ट करत लिहिले, 'तिची खेळाडू वृत्ती तर बघा. देशात सुरु असणाऱ्या आंदोलनांमुळे तिच्यासाठी हे वर्ष सोपं नव्हचं. रस्त्यावर उतरुन तिला सर्वांनी रडताना पाहिलं. पण या सगळ्याने ती खचली नाही तर उलट योद्ध्यासारखी लढली, असं इंग्लीश कमेंटेटर्स म्हणाले.'
 
तर सान्या मल्होत्राने लिहिले, 'ती फीनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून वर आली आहे. विनेश फोगाटने वर्ल्ड नंबर १ हरवलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला.'

ऑलिम्पिक 2024 मध्ये आता विनेश फोगाटचं मेडल निश्चित झालं आहे. सेमीफायनल सामन्यात तिने क्यूबाच्या यूसनेलिस गूजमैन लोपेजला 5-0 ने हरवलं आणि फायनलमध्ये स्थान पक्क केलं. ५० किलो वजनी गटात तिने हा विजय मिळवला. आज विनेश फायनल खेळणार असून तिचं लक्ष आता गोल्ड मेडलकडे आहे.

Web Title: Dangal Girls Fatima Sana Shaikh Sanya Malhotra praised wrestler Vinesh Phogat