"चित्रपटसृष्टीला एक नवसंजीवनी मिळाली …",'धुरंधर' बद्दल कंगणा राणौतची प्रतिक्रिया, रणवीर नाही 'या' अभिनेत्याची झाली फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:25 IST2026-04-17T11:22:38+5:302026-04-17T11:25:33+5:30

'धुरंधर'मधील 'या' अभिनेत्याचं काम पाहून भारावली कंगना राणौत, म्हणाली- " हिंदी चित्रपटसृष्टीला…"

bollywood actress kangana ranaut talk about dhurandhar 2 praise r madhavan performance says | "चित्रपटसृष्टीला एक नवसंजीवनी मिळाली …",'धुरंधर' बद्दल कंगणा राणौतची प्रतिक्रिया, रणवीर नाही 'या' अभिनेत्याची झाली फॅन

"चित्रपटसृष्टीला एक नवसंजीवनी मिळाली …",'धुरंधर' बद्दल कंगणा राणौतची प्रतिक्रिया, रणवीर नाही 'या' अभिनेत्याची झाली फॅन

Kangana Ranaut On Dhurandhar2: आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला आणि रणवीर सिंगची प्रमुख भूमिक असलेला 'धुरंधर - द रिव्हेंज' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ निर्माण झाली आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्डस मोडले आहेत.सर्वसामान्य प्रेक्षक सेलिब्रिटी आणि नेतेही या चित्रपटाबद्दल मतं व्यक्त करीत आहेत. अशातच कंगणा रणौतने पुन्हा एकदा या चित्रपटाबद्दल स्तुतीसुमने उधळली आहेत

'धुरंधर २' बघितल्यानंतर प्रेक्षकांपासून ते सेलिब्रिटी मंडळींनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे.  १९ मार्चला,  रिलीज झालेला ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफीसवरही चांगलीच कमाई करतोय. या चित्रपटाने १००० कोटींचा गल्ला पार केला असून जगभरातही भरपूर कमाई होत आहे.एएनआयसोबत संवाद साधताना कंगना राणौत म्हणाली,"इंडस्ट्री एका अर्थाने देशापासून तुटत होती. प्रेक्षकांचा सहभाग कमी झाला होता आणि लोकांना चित्रपट पाहण्याची इच्छा नव्हती. यामुळे दक्षिण भारतीय चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल अधिक वाढला. कारण हे सिनेमे त्यांची संस्कृती आणि परंपरेवर आधारित कथांवर लक्ष केंद्रित करत होते.मात्र, अशा कथांना प्रेक्षकांनी स्विकारलं आहे. त्यामुळे चित्रपटाने चांगला व्यवसाय केलाय हे आपण देखील पाहत आहोत. धुरंधरने हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवसंजीवनी दिली आहे आणि आशा जागवली आहे. 

आर.माधवनचं कौतुक करत म्हणाली...

दरम्यान, कंगनाने चित्रपटातील आर माधवनच्या भूमिकेचं कौतुक केलं. चित्रपटात त्यांची भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. कंगना म्हणाली,"आर.माधवनने चित्रपटात उत्कृष्ट काम केलं आहे. मी अजित डोवालजींना भेटले आहे, त्यांचे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे."

यानंतर पुढे कंगना म्हणाली,"मला वाटतं की, डोवालजींवर एक पूर्ण वेगळा चित्रपट बनवला पाहिजे. तरच त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय मिळेल. तरीही माधवने त्यांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. तो एक उत्तम अभिनेता आहे."

Web Title : कंगना ने 'धुरंधर' की प्रशंसा की, हिंदी सिनेमा को पुनर्जीवित करने का श्रेय दिया।

Web Summary : कंगना रनौत ने 'धुरंधर' की हिंदी सिनेमा को पुनर्जीवित करने के लिए प्रशंसा की, दर्शकों के साथ इसके सांस्कृतिक संबंध को उजागर किया। उन्होंने अजित डोभाल से प्रेरित आर. माधवन के प्रदर्शन की सराहना की और चरित्र के लिए एक समर्पित फिल्म का सुझाव दिया।

Web Title : Kangana praises 'Dhurandhar', credits it with reviving Hindi cinema.

Web Summary : Kangana Ranaut praised 'Dhurandhar' for revitalizing Hindi cinema, highlighting its cultural connection with audiences. She lauded R. Madhavan's performance, inspired by Ajit Doval, suggesting a dedicated film for the character.