लग्नानंतर अभिनेत्री तापसी पन्नू सोडणार बॉलिवूड? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:50 IST2024-04-04T16:50:11+5:302024-04-04T16:50:30+5:30

सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकाच लग्नाची चर्चा सुरु आहे.

Actress Taapsee Pannu tied the knot with Mathias Boe will leave Bollywood after marriage | लग्नानंतर अभिनेत्री तापसी पन्नू सोडणार बॉलिवूड? म्हणाली...

लग्नानंतर अभिनेत्री तापसी पन्नू सोडणार बॉलिवूड? म्हणाली...

सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकाच लग्नाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा म्हणजे अभिनेत्री तापसी पन्नू आणि तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोच्या लग्नाची. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानतंर तापसी आणि मॅथियासनं अखेर त्यांच्या नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला.  दोघांनी 23 मार्च 2024 रोजी लग्न केल्याची माहिती आहे. त्यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. आता लग्नानंतर अभिनेत्री करिअर सोडणार की काय अशी चर्चा रंगली आहे.

तापसीनं प्रियकर मॅथियाससोबत उदयपूरमध्ये लग्न केलं. जरी, त्यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी त्यांच्या लग्नातील पहिला व्हिडिओ समोर येताच व्हायरल झाला. आता लग्नानंतर पहिल्यांदाच तापसी पन्नूने 'Elle' मॅगझिनशी संवाद साधला. यावेळी सुखी वैवाहिक आयुष्याचा पुरेपूर आनंद घेणार असल्याचं तिनं सांगितलं. तसेच आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने जगतेय का हे सुनिश्चित करायचं आहे, असं ती म्हणाली. 

तापसी म्हणाली, 'मला कामाच्या पलीकडे जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. वेळेच्या कसोटीवर टिकणार नाही अशा गोष्टीसाठी मला वेळ द्यायचा नाही. स्वत:शिवाय इतर कोणाशीही स्पर्धा न करण्यातच मी आनंदी आहे. सध्या व्यवसायाच्या पलीकडे आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे'. पुढे ती म्हणाली, 'तुमच्या आजूबाजूला नेहमीच असे लोक असतील ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त किंवा कमी असेल. सगळ्यात पुढे पोहचण्याच्या शर्यतीत आपण हे विसरतो की, 'टॉप' असं काही नाही आहे.  मला एक गोष्ट कळाली आहे, ती म्हणजे जीवनाचा आनंद घेणे'.

तापसीचा पती मॅथियास हा एक बॅडमिंटनपटू आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. एका मॅचदरम्यान दोघांची भेट झाली होती. गेल्या काही वर्षांपासून मॅथियाससोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही अनेकदा एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तापसी आणि मॅथियास शक्य तितका जास्त वेळ त्यांच्या नात्याला देताना दिसतात. त्यामुळं तापसी लग्नानंतर बॉलिवूडपासून कायमची दूर जाते की प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिलं का पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Actress Taapsee Pannu tied the knot with Mathias Boe will leave Bollywood after marriage