मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:03 AM2024-03-19T10:03:03+5:302024-03-19T10:14:13+5:30

Tiger shroff: टायगरने घेतलेलं हे घर ४ हजार २४८ स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं आहे.

actor-tiger-shroff-home-in-pune-know-the-price-and-location | मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

मुंबई सोडून टायगरने घेतलं पुण्यात घर; आलिशान घराची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

जबरदस्त अॅक्शन सीन, पिळदार शरीरयष्टी आणि उत्तम अभिनयकौशल्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger shroff) . अभिनेता जॅकी श्रॉफचा (Jackie Shroff) लेक असलेल्या टायगरने स्वत:च्या हिमतीवर कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे टायगरने नुकतंच पुण्यात घर खरेदी केलं असून त्याच्या या नव्या घराची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

टायगर लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात झळणार आहे. त्यामुळे सध्या तो या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या सिनेमाची चर्चा रंगत असतानाच सोशल मीडियावर टायगरच्या नवीन घराचीही चर्चा रंगली आहे. मुंबई सोडून टायगरने थेट पुण्यात आलिशान घर घेतलं आहे.

'मनी कंट्रोल'नुसार, टायगरने पुण्यात घर खरेदी केलं आहे. ४ हजार २४८ स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या घराची किंमत ७.५ कोटी रुपये इतकी आहे. या घरासाठी टायगरने ५२.५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. ५ मार्च रोजी त्याने स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.

भाडेतत्वावर दिलं घर

टायगरने पुण्यातील हे घर साडेतीन लाख रुपये भाडेतत्त्वावर दिलं आहे. हे घर चेरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने भाड्याने घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, मुंबईमध्येही टायगरचं ८ बीएचके आलिशान घर आहे. त्याचं हे घर खार येथे असून ३५ कोटी रुपयांचं हे घर असल्याचं सांगण्यात येतं.

Web Title: actor-tiger-shroff-home-in-pune-know-the-price-and-location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.