Video: हातात सुटकेस, वाढलेले केस! ९० च्या सुपरस्टार अभिनेत्याची झाली 'अशी' अवस्था, कोणी ओळखलंच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:55 IST2026-04-18T11:54:52+5:302026-04-18T11:55:58+5:30
तुम्ही झगमगाटाच्या या दुनियेपासून दूर जाता तसं मात्र लोक तुम्हाला विसरतात. इतकंच नव्हे, बाजूने गेलात तरी लोक अशा कलाकाराला ओळखत नाहीत. नुकताच असा अनुभव आला आहे. जेव्हा एका बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video: हातात सुटकेस, वाढलेले केस! ९० च्या सुपरस्टार अभिनेत्याची झाली 'अशी' अवस्था, कोणी ओळखलंच नाही
बॉलिवूडची दुनिया अशी आहे की, एकेकाळी तुम्ही लोकप्रियतेच्या शिखरावर असता तेव्हा लोक तुमची वाहवा करता. परंतु जसं तुम्ही झगमगाटाच्या या दुनियेपासून दूर जाता तसं मात्र लोक तुम्हाला विसरतात. इतकंच नव्हे, बाजूने गेलात तरी लोक अशा कलाकाराला ओळखत नाहीत. नुकताच असा अनुभव आला आहे. जेव्हा एका बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
९० चं दशक गाजवलेल्या या बॉलिवूड कलाकाराला ओळखणंही कठीण झालं आहे. हा अभिनेता म्हणजे राहुल रॉय. या व्हिडिओमध्ये अभिनेता एका सामान्य माणसाप्रमाणे रस्त्यावरून आपली जड ट्रॉली बॅग ओढत नेताना दिसत आहे. वाढलेले केस आणि हातात सुटकेस या अवतारात राहुल रॉयला कोणीच ओळखलं नाही. सध्या राहुल बॉलिवूडपासून दूर एकाकी जीवन जगत आहे. तो कोणत्याही पार्टी, इव्हेंट आणि पुरस्कार सोहळ्यापासून दूर आहे.
'बस एक सनम चाहिए आशिकी के लिए' या गाण्याने एकेकाळी तरुणाईला वेड लावणारा हा अभिनेता व्हिडिओमध्ये अत्यंत साध्या वेशात दिसत आहे. राहुल रॉयला अशा अवतारात पाहताच चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. "जेव्हा चित्रपटसृष्टी खऱ्या कलाकारांना संधी देत नाही, तेव्हा त्यांना अशाच प्रकारे संघर्ष करावा लागतो," अशी हळहळही एका चाहत्याने व्यक्त केली.
राहुल रॉयची कारकीर्द
१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' या चित्रपटाने राहुल रॉयला रातोरात सुपरस्टार बनवले. हा चित्रपट सलग ६ महिने हाऊसफुल्ल चालला होता. या यशामुळे राहुलला 'रोमँटिक हिरो' आणि 'लव्हर बॉय' अशी ओळख मिळाली. मात्र, पहिल्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्याचे पुढचे २५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्याने 'फिर तेरी याद आई', 'जानम', 'सपने साजन के', 'गुमराह' आणि 'मझदार' यांसारख्या चित्रपटांत काम केले. तसेच त्यांनी भोजपुरी चित्रपटांमध्येही नशीब आजमावले होते.
२००६ मध्ये त्यांनी 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचे विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले होते. परंतु सध्या राहुल अज्ञातवासात असल्यासारखा आयुष्य जगत आहे. त्यामुळेच राहुलचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.