घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:27 IST2025-06-12T09:26:46+5:302025-06-12T09:27:07+5:30

पियुषविषयी बोलताना अभिनेत्रीच्या अश्रूंचा बांध फुटला.

actress shubhangi atre gets emotional while remembering ex husband piyush poorey who died after divorce | घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक

घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre)  फेब्रुवारी महिन्यात पती पियुष पुरेसोबत घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर दोनच महिन्यात पियुष पुरेचं निधन झालं. डॉक्टरांनी पियुषला त्याच्या तब्येतीबाबतीत सावधगिरी बाळगायला सांगितली होती असं शुभांगी म्हणाली. आता नुकतंच एका मुलाखतीत एक्स पतीच्या आठवणीत शुभांगी भावुक झाली आहे. पियुषविषयी बोलताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला.

एका मुलाखतीत शुभांगी अत्रे म्हणाली, "हे खूपच दुर्भाग्यपूर्ण होतं. त्याला व्यसन होतं. डॉक्टरांनी त्याला खूप आधीच सांगितलं होतं की जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केला नाही तर हे होऊ शकतं. तर मला माहित होतं की हे कधी ना कधी होणार. पण इतक्या लवकर होईल याची कल्पना नव्हती. मी कायम त्याच्यासोबतच्या चांगल्या आठवणी स्मरणात ठेवेन. माझं त्याच्यावर प्रेम होतं. मी हे कधीच विसरु शकणार नाही. आशीवर तुझा आशीर्वाद कायम असो. आम्हा दोघींना मार्गदर्शन करत राहा. बस इतकंच बोलू शकते." सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या पेजवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 


आशी ही पियुष आणि शुभांगीची मुलगी आहे. एप्रिल महिन्यात लिव्हर सिरॉसिसमुळे पियुषचं निधन झालं होतं. शुभांगीने २००३ साली पियुषशी लग्नगाठ बांधली होती. २००५ साली त्यांना मुलगी झाली. तर लग्नानंतर २२ वर्षांनी २०२५ मध्ये शुभांगीने घटस्फोट घेतला. त्यानंतर दोनच महिन्यात पियुषचं निधन झालं.

शुभांगी अत्रेने 'कसौटी जिंदगी की','कस्तूरी और चिडिया घर' सारख्या मालिकांमध्ये काम केलं. तर 'भाभीजी घर पर है' मालिकेने तिला ओळख दिली. तिची अंगुरी भाभी ही भूमिका खूप गाजली.

Web Title: actress shubhangi atre gets emotional while remembering ex husband piyush poorey who died after divorce