शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:16 IST2026-04-20T14:15:21+5:302026-04-20T14:16:15+5:30
Asha Bhosle mortal remains immersed in Ganga: आशाताईंच्या निधनानंतर नवव्या दिवशी अस्थींचे गंगा नदीत विसर्जन

शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Asha Bhosle mortal remains immersed in Ganga: 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या इच्छेनुसार आज त्यांच्या अस्थींचे विसर्जन वाराणसी येथे पवित्र गंगा नदीत विधीवत करण्यात आले. संगीत जगतातील अद्वितीय सूर म्हणजे आशा भोसले. त्यांच्या निधनाच्या आजच्या ९व्या दिवशी आज त्यांच्या अस्थींचे विसर्जन गंगा नदीत करण्यात आले.
पद्मविभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या निधनानंतर नवव्या दिवशी आज वाराणसी येथील पवित्र गंगा नदीत मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी अस्थींचे विधीवत विसर्जन केले.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 20, 2026
आज वाराणसी येथे गंगा नदीवरील नमो घाटावरून आशाताईंचे छायाचित्र… pic.twitter.com/LZp7LphwEl
आज वाराणसीमध्ये गंगा नदीच्या नमो घाटावरुन आशाताईंचे छायाचित्र असलेल्या फुलांनी सजवलेल्या बोटीतून त्यांच्या गाण्यांच्या मंद स्वरात अस्थिकलश मंत्रोच्चारात मणीकर्णिका घाटापर्यंत नेण्यात आला. या मुख्य बोटीच्या बाजूने एनडिआरएफच्या जवानांच्या मानवंदना देणाऱ्या बोटी अशा वातावरणात मणीकर्णिका घाटापर्यंत अस्थीकलश नेण्यात आला. तिथे त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी विधिवत पिंडदान करुन अस्थी विसर्जन केले. यावेळी त्यांची पत्नी अनुजा व आशाताईंची नात जनाई यांच्यासह आशाताईंना अखेरपर्यंत साथ देणारे 'भाऊ' राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, योगेश खडिकर, स्थानिक आमदार अवधेश सिंह यांच्यासह जीवनगाणी मित्रपरिवारातील सदस्य याक्षणी परिवारासोबत उपस्थितीत होते.