शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

​तरुणांनो...पार्टीत जाताय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 16:43 IST

एखादी पार्टी किंवा समारंभ असला की तिथे जाण्यासाठी नटूनथटून जाणे हे आता फक्त महिलांच्याच बाबतीत राहिले नाही, तर पुरुषही त्यात मागे नाहीत. पार्टीत आपला प्रभाव इतरांपेक्षा वेगळा पडावा यासाठी पुरुषही विशेष वेशभूषा करताना दिसू लागले आहेत.

-Ravindra Moreएखादी पार्टी किंवा समारंभ असला की तिथे जाण्यासाठी नटूनथटून जाणे हे आता फक्त महिलांच्याच बाबतीत राहिले नाही, तर पुरुषही त्यात मागे नाहीत. पार्टीत आपला प्रभाव इतरांपेक्षा वेगळा पडावा यासाठी पुरुषही विशेष वेशभूषा करताना दिसू लागले आहेत. नाताळ आणि ३१ डिसेंबर रोजी मित्रमंडळी, नातेवाईक तसेच आॅफिसचे सहकारी यांच्यातील पार्ट्या ठरलेल्याच असतात. साहजिकच या पार्ट्यांमध्ये फॅशनेबल दिसायला कोणाला नाही आवडणार. आजच्या सदरात तरुणांनी कोणती फॅशन करावी किंवा आपला लूक इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी कोणता पेहराव करावा याबाबत जाणून घेऊया. लेदर जॅकेटपार्टीत पेहरावात रुबाबदार लेदर जॅकेटस्ची भर पडू लागली आहे. आधी फक्त शर्ट आणि टी-शर्ट हे दोनच पर्याय मुलांसाठी उपलब्ध होते. त्याने त्यांच्यातील रांगडेपणा अधिक अधोरेखित होतो. त्यामुळे हल्ली पार्टीमध्ये लेदर जॅकेट्स मोठ्या प्रमाणात दिसतात. ब्ल्यू डेनिम, फिटिंग व्हाईट प्लेन टी-शर्ट, त्यावर वजनदार लेदर जॅकेट आणि पायात हाइटेड शूज असा रॉकस्टार लूक पार्टीला जाताना कॅरी केलेला पाहायला मिळतो.लोफरविशेष प्रसंगी आपण फॅशनेबल जॅकेट, टी-शर्ट, चिनोज असे पोशाख परिधान करून जातोच. या पोशाखात अधिक आकर्षक दिसण्यासाठी बूट किंवा चपलांऐवजी लोफरचा वापर करु शकता. विशेष म्हणजे जिन्स आणि चिनोज या दोघांवर हे रंगीबेरंगी लोफर एकदम चांगले दिसतात.ब्लेझरपार्टीसाठी ब्लेझर घालणं हा काही नवीन प्रकार नाही. ब्लेझर ही जुनी स्टाइल आहे. मात्र काळानुरूप त्याचे रंग आणि डिझाइन्समध्ये थोडेफार बदल झाले आहेत इतकंच. लेदर जॅकेट्सच्या स्टाइलप्रमाणे ब्लेझरही पाटीसार्ठी पूर्वीपासूनच इन आहेत. हल्ली लेदर जॅकेटला पर्याय म्हणून वेल्व्हेट ब्लेझरसुद्धा बाजारात आले आहेत. अशा प्रकारचे जॅकेट्स आणि ब्लेझर सर्वसामान्यपणे डेनिमवर परिधान केलेले पाहायला मिळतात. तसेच कॉटनच्या चिनोजवरही हे जॅकेट्स शोभून दिसतात. तसेच सध्या प्रिटेंड ब्लेझरचीही सध्या तरुणांमध्ये चलती दिसून येते.वुलन मफलर किंवा स्कार्फहिवाळ्यात बरेचजण पूूर्वी मफलरचा वापर करायचे. मात्र, तरुणांना ते आवडत नसे. कारण त्यामुळे पारंपारिक लूक दिसायचा. मात्र आता मफलरने आधुनिक अवतार घेतला असून ते स्कार्फ  म्हणून ओळखले जाऊ लागले. हे स्कार्फ नुसते उबेसाठीच नव्हे तर रुबाबदारपणासाठीदेखील वापरले जाऊ शकते. कारण मफलर हीसुद्धा स्टाइल स्टेटमेन्ट बनत चालली आहे. त्यामुळे पार्टीत जाताना थंडी असो वा नसो विविध रंगाचे किंवा चेक्स असलेले मफलर गळ्याभोवती लपेटून घेणे तरुणाई पसंत करू लागली आहे. प्लेनमध्येसुद्धा वुलन मफलर बाजारात उपलब्ध आहेत. प्रिंटेड मफलर फूल स्लीव्ह टी-शर्टवर परिधान केले जातात. वुलन मफलर थोडे महाग पडतात. मात्र खास पार्टी असेल तर त्यात आपला प्रभाव पाडण्यासाठी तेवढा खर्च करायला हरकत नाही. वुलन मफलरला दुसरा पर्याय स्कार्फचा आहे. स्कार्फ मध्ये चेक्सच्या स्कार्फला तरुण अधिक पसंती देतात.स्टॅण्ड कॉलरपार्टीसाठी एक चांगला पर्याय आहे, तो स्टॅण्ड किंवा चायनीज कॉलर शर्टचा. हे स्टॅण्ड कॉलर शर्ट बरेच लोकप्रिय होत आहेत. प्लेनमध्ये ब्राऊन, ब्लॅक, व्हाइट रंगातले हे शर्ट पार्टीसाठी चांगले आहेत. शायनिंगच्या शर्टसाठी चायनीज कॉलर असलेले कॉटन शर्ट पार्टीसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत.