हरभजन गीता यांचे लग्न हे या वर्षीचे हायप्रोफाईल लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:22 IST2016-01-16T01:15:39+5:302016-02-13T02:22:18+5:30
आज दिल्लीत होणार शानदार रिसेप्शन क्रिकेटर हरभजन सिंग व अभिनेत्री गीता बसरा यांचे लग्न हे या वर्षीचे...

हरभजन गीता यांचे लग्न हे या वर्षीचे हायप्रोफाईल लग्न
आ दिल्लीत होणार शानदार रिसेप्शन क्रिकेटर हरभजन सिंग व अभिनेत्री गीता बसरा यांचे लग्न हे या वर्षीचे हायप्रोफाईल लग्न ठरले आहे. दोघेही दोन दिवसांपूर्वी विवाहित झाले. विशेष म्हणजे दुसर्याच दिवशी गीताने करवां चौथचा उपवास ठेवला होता. गीताच्या सासूबाई अवतार कौर यांनी तिला कोबीचा पराठा खाऊ घातला तर संध्याकाळी हरभजनने मिठाई भरवून तिचा उपवास सोडला.
यावेळी गीता भज्जीला गिफ्ट मागायलाही विसरली नाही. मी तुला सर्वच दिले आहे, आता तुला जर माझ्या हातातील कडे हवे असेल तर तेही घेऊन टाक असे उत्तर हरभजनने दिल्यावर सर्वत्र हशा पिकला. हरभजन व गीताच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये रविवारी 1 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे.