वर्ल्ड्स बेस्ट डॅड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 01:29 IST2016-03-09T08:29:41+5:302016-03-09T01:29:41+5:30
शेजारी बसलेल्या त्याच्या वडिलांनी सेंकदाहूनही कमी क्षणात मुलाच्या चेहऱ्यासमोर हात करून त्या बॅटचा फटका झेलला आणि फार मोठा अनर्थ टळला.
वर्ल्ड्स बेस्ट डॅड!
आईवडिल मुलांसाठी काहीही करू शकतात. त्यांच्या पालनपोषणापासून त्यांचे हट्ट पुरविण्यापर्यंत सर्वच काही.मुलगा कसाही असू द्या, पालकांसाठी तो नेहमीच काळजाचा तुकडा असतो. अशा जीवापेक्षा जास्त जवळच्या मुलावर संकट आले तर त्यांना वाचविण्यासाठी पालकांमध्ये दहा हत्तीचे बळ येते.
याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हा बाप. एका स्वच्छ सुर्यप्रकाशित दिवशी हे बाप-लेक बेसबॉलची मॅच पाहायला गेले होते. पायरेट विरुद्ध ब्रेव्हज् अशी ती प्रॅक्टिस मॅच होती. अचानक बॅटिंग करणाऱ्या खेळाडूच्या हातून बेसबॉल बॅट सटकली आणि थेट प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावल्या गेली.
सर्वजण वाचण्यासाठी बाजूला सरकण्याचा प्रयत्न करत असताना हा चिमुरडा मोबाईलमध्ये गुंग होता. त्याला काही खबरच नाही की, बॅट त्याच्या दिशेने येत आहे.
शेजारी बसलेल्या त्याच्या वडिलांनी सेंकदाहूनही कमी क्षणात मुलाच्या चेहऱ्यासमोर हात करून त्या बॅटचा फटका झेलला आणि फार मोठा अनर्थ टळला.
मैदानावर उपस्थित असणाऱ्या क्रिस्टोफर हॉर्नर या फोटोग्राफरने हा चित्त थरारक क्षण कॅमेऱ्यात कैैद केला आणि जगाला या बेस्ट डॅडची कामगीरी माहित झाली. एखाद्या चित्रपटात शोभून दिसेल अशी ही घटना. आणि हा बाप कोण्या हीरोपेक्षा कमी नाही!
{{{{twitter_post_id####

}}}}@BiertempfelTrib The two frames showing just how close the bat was to the boy's head. pic.twitter.com/7VwnfWp8L1
— Christopher Horner (@Hornerfoto1) March 6, 2016